Chaitanya Sayaji Wadekar Maharaj Arrested: प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराजांना अटक
Chaitanya Sayaji Wadekar Maharaj Arrested: प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांना त्यांच्या भावांसह अटक करण्यात आली आहे. त्यांचे यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.
पुणे :- प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर Chaitanya Sayaji Wadekar Maharaj Arrested यांना पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी चैतन्य महाराज यांच्यासह त्यांच्या दोन भावांना अटक केली आहे. चैतन्य सयाजी वाडेकर, अमोल सयाजी वाडेकर, प्रमोद सयाजी वाडेकर आणि ऋषिकेश शशिकांत सूर्यवंशी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य महाराज व इतरांवर बेकायदेशीरपणे जमाव जमवून कंपनीकडे जाणारा रस्ता जेसीबी व पोकलेन मशीनच्या साह्याने खोदल्याचा आरोप आहे.या उत्खननादरम्यान, गॅस पाइपलाइन खराब होऊ शकतात, ज्यामुळे लोकांना धोका निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर या कालावधीत कंपनीची भिंतही पाडण्यात आली असून वीजवाहिन्यांचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी चैतन्य महाराज यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.फिर्यादीवरून चैतन्य सयाजी वाडेकर, अमोल सयाजी वाडेकर यांच्यासह त्यांच्या अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावर कारवाई करत पोलिसांनी चैतन्य महाराज व इतरांना अटक केली.
चैतन्य महाराज कोण आहेत?
चैतन्य महाराजांचे नाव चैतन्य महाराज वाडेकर आहे. त्यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1994 रोजी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भांबोली गावात झाला. त्यांनी आळंदीच्या संत ज्ञानेश्वर विद्यालयातून माध्यमिक शिक्षण घेतले. चैतन्य महाराजांनी आळंदीत संत साहित्याचा अभ्यास केला. त्याचे यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.
मदालसा वारकरी शैक्षणिक संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष असून त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून ते संत साहित्याचा प्रसार करतात. याच कारणामुळे त्यांना एक युवा कीर्तनकार म्हणूनही ओळख मिळाली आहे.चैतन्य महाराज देखील त्यांच्या खास कीर्तन शैलीमुळे प्रसिद्ध आहेत. चैतन्य महाराज यांचे 2021 साली लग्न झाले.