Tilak Nagar Chain Snatching News : सांताक्रुज चेंबूर लींक रोड, स्टार जंक्शन च्या परिसरात मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी कारमधून आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचली आणि तिथून पळून गेले.
मुंबई :- मॉर्निंग वॉकला निघालेल्या व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चैन कार मधून आलेल्या तीन चोरट्यांनी लंपास केल्याची घटना टिळकनगरमध्ये घडलीये. फिर्यादी सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड, स्टार जंक्शन च्या जवळ टिळक नगर चेंबूर परिसरात मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेला होतो. Tilak Nagar Chain Snatching त्याचवेळी कारमधून आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचली आणि तिथून पळून गेले.ही सर्व घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिळक नगर पोलीस ठाण्याचे Tilak Nagar Police Station वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ चार पोलीस पथके तयार करण्यात आले. पोलिसांनी तांत्रिक तपासाने आणि गुप्त बातमीदारामार्फत गुन्ह्यात वापरलेल्या वाहन आणि तीन आरोपी निष्पन्न केले. आरोपी सातत्याने ठावठिकाणा बदलत असल्याने पोलिसांनी मोठ्या शिताफीने अंधेरी इथून पाठलाग करून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आली आहे.मोहमद मेहसाद जलील खान उर्फ सोनु,(वय 21,रा. नारायण नगर, घाटकोपर मुंबई),समीर मोहमद अन्सार अहमद शेख, (वय 20),मोहमद नसीब मुख्तार अहमद, (वय 19) असे अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपीकडून चाळीस हजार रुपये किंमतीची सोन्याचे चैन आणि चोरी करताना वापरलेली कार असा एकूण तीन लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपींनी यापूर्वीही मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अशाच प्रकारे पळवले असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींच्या विरोधात वडाळा टी टी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असून पोलीस आणखी गुन्हे उघडकीस आणत आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह देशमुख हे करीत आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…