क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Chain Snacher News : सातिवली तलाव परिसरात फिर्यादीची सोन्याची चैन खेचणाऱ्या टोळीला बेड्या; वालीव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Vasai Police Caught Chain Snacher : अंधाराचा फायदा घेत वॉकिंग करणाऱ्या व्यक्तीला लक्ष्य करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद; 80 हजारांचा मुद्देमाल जप्त

वसई/वालीव | वसईच्या सातिवली तलाव परिसरात रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या एका टोळीचा वालीव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. फिरण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरीने खेचून पसार झालेल्या तीन सराईत गुन्हेगारांना गुन्हे प्रकटीकरण शाखेने कौशल्यपूर्ण तपास करून बेड्या ठोकल्या आहेत. Vasai Latest Crime News

नेमकी घटना काय?

15 डिसेंबर 2025 रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी हे सातिवली तलावाजवळील ट्रॅकवर वॉकिंग करत होते. त्यावेळी अंधाराचा फायदा घेऊन एका अनोळखी इसमाने त्यांच्यावर झडप घातली आणि गळ्यातील 80 हजार रुपये किमतीची 8 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन खेचून पळ काढला. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 304(2) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासाची चक्रे फिरली आणि आरोपी गळाला लागले वाढत्या जबरी चोरीच्या घटनांमुळे वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळाचा आढावा घेऊन तांत्रिक तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वासराव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संशयित हालचालींवर लक्ष ठेवले. अखेर, गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कामण आणि सातिवली परिसरातून तीन आरोपींना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेले आरोपी

1) फरहान हलियास खान (वय 18, रा. कामण)

2) पियुष राजेश दुबे (वय 18, रा. सातिवली)

3) संदीप गणेश चौहान (वय 25, रा. सातिवली)

कौशल्यपूर्ण तपासातून गुन्ह्याची कबुली पोलिसांनी या तिघांची कसून चौकशी केली असता, सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या त्रिकुटाने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेली 80 हजार रुपये किमतीची संपूर्ण सोन्याची चैन हस्तगत केली आहे. अवघ्या काही दिवसांतच या जबरी चोरीचा छडा लावल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे. Vasai Chain Snacher Latest News

या पथकाने बजावली कामगिरी

ही यशस्वी कामगिरी पोलीस उप-आयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वासराव बाबर, सहाय्यक फौजदार शैलेश पाटील, किरण म्हात्रे, आनंद मोरे, बाळू कुटे, विनायक राऊत आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0