मुंबई
Trending

Central MegaBlock News : कांजूरमार्ग स्थानकातील पुलाच्या पाडकामासाठी मध्य रेल्वेवर आज रात्री ‘मेगा ब्लॉक’

Central MegaBlock News : विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहुर स्थानकांवर लोकल सेवा उपलब्ध नाही; पहाटे 5 पर्यंत गाड्यांवर परिणाम

मुंबई :- मध्य रेल्वेवरील कांजूरमार्ग स्थानकातील कल्याण दिशेकडील जुन्या पादचारी पुलाचे पाडकाम करण्यासाठी आज, शनिवारी (18 ऑक्टोबर 2025) रात्री पाच तासांचा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे रात्रीच्या वेळी लोकल सेवेवर मोठा परिणाम होणार असून, काही लोकल रद्द तर काही अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेवर आज रात्री 12 ते पहाटे 5 या कालावधीत अप आणि डाऊन धिम्या, जलद मार्गांसह पाचव्या आणि सहाव्या मार्गावर हा मेगा ब्लॉक असेल. या ब्लॉकदरम्यान पुलावरील तुळया हटवण्यासाठी 100 मेट्रिक टन क्षमतेच्या रोड क्रेनचा वापर केला जाणार आहे.

या स्थानकांवर लोकल थांबा नसेल

ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे विद्याविहार, कांजूरमार्ग व नाहुर या स्थानकांवर रात्रीच्या वेळी लोकल उपलब्ध होणार नाही.

ब्लॉकमुळे रद्द होणाऱ्या लोकल

रात्री 11.40 ची ठाणे – कुर्ला लोकल

पहाटे 4.04 ची ठाणे – सीएसएमटी लोकल

रात्री 11.38 ची सीएसएमटी – ठाणे लोकल

रात्री 12.24 ची सीएसएमटी – ठाणे लोकल

ब्लॉकमुळे अंशतः रद्द होणाऱ्या लोकल

रात्री 11,11.12,11.46 आणि 11.55वाजता सीएसएमटीहून सुटणाऱ्या ठाण्याकडे जाणाऱ्या लोकल कुर्ल्यापर्यंत चालवण्यात येतील.

रात्री 10.18 ची डोंबिवलीहून सुटणारी सीएसएमटी लोकल ठाण्यापर्यंत चालवण्यात येईल.

प्रवाशांनी नियोजित वेळेत होणारा बदल लक्षात घेऊन प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0