मुंबई :- कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रम्मी व्हिडीओवरून सुरु झालेलं वादाचं चक्र आता थेट मारहाणीपर्यंत पोहोचलं आहे. लातूरमध्ये ‘अखिल भारतीय छावा संघटने’च्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते उधळून निषेध नोंदवला. मात्र, या निषेधाला वळण लागलं हाणामारीचं!
या घटनेदरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी ‘छावा’ कार्यकर्त्यांना सार्वजनिक ठिकाणी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे महा युती सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठली असून विरोधकांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
या मारहाणीप्रकरणी सूरज चव्हाणसह 10 जणांवर लातूरमधील विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या दोन वेगवेगळ्या टीम्स सध्या सूरज चव्हाण यांच्या शोधात आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले?
काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे.
अजित पवार यांच्याकडून सुरज चव्हाण यांना राजीनामा देण्याच्या सूचना
काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…