Call Morphing : सायबर चोरट्यांकडून कुमार बिल्डरला 50 लाखांचा चूना
•Call Morphing बिल्डरचे ऑनलाईन फसवणूक, 50 लाखाची फसवणूक दुसऱ्या दिवशी 48 लाखाची मागणी
पुणे :- कॅम्प परिसरातील कुमार प्रॉपर्टीज यांच्या कार्यालयात पुण्यातील नामांकित बांधकाम व्यवसायिकाच्या नावाने त्याच्या फोन करून 50 लाखाचा चुना लावल्याचे घटना समोर आली आहे. 01 जुलै ते 10 जुलै दरम्यान कुमार प्रॉपर्टी च्या कार्यालयात कॉल करून हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कंपनीचे कर्मचारी मितेश उदेशी (47 वर्ष), यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. अग्निवेश राय असे नाव सांगून त्यांनी 50 लाखाची फसवणूक केल्याची तक्रार सायबर विभागाला दिली आहे. सायबर विभागाने कलम 319 (2),318 (4), 3 (5) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मितेश उदेशी हे कॅम्प परिसरातील कुमार प्रॉपर्टीज आणि प्रमोटर्स प्रा. ली. याठिकाणी चीफ मॅनेजिंग ऑफिसर म्हणून काम करतात.ऑफिसमध्ये काम करत असताना त्यांना एक मिस कॉल आला. त्यांनी टू कॉलरवर पडताळणी केली असता तो नंबर त्यांचे सीईओ राजस जैन यांचा असल्याचे दिसले. त्यांना परत फोन केला असता त्यांनी तो कट केला. त्यानंतर सायबर चोरट्याने कंपनीच्या लँण्ड लाईन वर फोन करुन राजस जैन बोलत असल्याचे भासवले.ऑपरेटला मितेश यांना मोबाईलवर पाठवलेला मेसेज लगेच पाहण्यास सांगा असा निरोप दिला. तसेच मी मिटींगमध्ये असल्याने फोन उचलता येत नसल्याचे सांगितले. मितेश यांनी मेसेज वाचला असता त्यामध्ये अग्निवेश राय या नावाच्या बँक खात्यात 49 लाख 60 हजार 400 रुपये तातडीने ट्रान्स्फर करा असे सांगितले. त्यानुसार फिर्य़ादी यांनी कंपनीच्या बँक खात्यातून पैसे पाठवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मेसेज करुन 48 लाख 60 हजार रुपये पाठवण्यास सांगितले. तसेच दुपारी सह्या करतो असे सांगितले.
मितेश यांनी फोन केला मात्र सायबर चोरट्याने फोन कट केला. त्यामुळे संशय आल्याने फिर्यादी यांनी चौकशी केली असता राजस जैन यांच्याकडे दुसरा मोबाईल नसल्याचे समजले. त्यामुळे मितेश यांनी राजस यांच्या मुळ मोबाईल क्रमांकावर फोन केला असता त्यांनी मी असा कोणाताही मेसेज केला नाही किंवा कोणाला पैसे पाठवण्यास सांगितले नाही असे सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मितेश यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.