मुंबई

Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत देवेंद्र फडणवीस सरकारने घेतले हे मोठे निर्णय, अजित पवार म्हणाले ‘जनहित सर्वोपरि…’

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, आमच्या सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले ज्यात सार्वजनिक हित सर्वोपरि आहे.

मुंबई :- देवेंद्र फडणवीस सरकारने मंगळवारी (18 फेब्रुवारी) अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापना, एएनटीएफ विभागात नवीन पदांची निर्मिती यासह अनेक निर्णयांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून याबाबत माहिती दिली.

जनहित प्रथम पाहणाऱ्या आपल्या सरकारनं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले काही महत्त्वपूर्ण निर्णय

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 1 हजार 594 कोटींची मान्यता. या योजनेतून अवर्षण प्रवण भागात 1 लाख 8 हजार 197 हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा. (जलसंपदा विभाग)

अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकरिता (ANTF) 346 नवीन पद निर्मिती व त्यासाठीच्या खर्चास मान्यता.(गृह विभाग)

सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता. (वित्त विभाग)

राज्यातील रोपवेच्या कामांसाठी राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. (NHLML) ला आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास मान्यता. (सार्वजनिक बांधकाम विभाग)

जळगांव जिल्ह्यामधील चाळीसगांव तालुक्यातील वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्पाच्या 1 हजार 275 कोटी 78 लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता. चाळीसगाव, भडगाव तालुक्यातील 8 हजार 290 हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा. (जलसंपदा विभाग)

पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन देण्यास मंजूरी. (महसूल विभाग)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0