Prasad Lad Vs Manoj Jarange Patil : बाय द वे,मि. जरांगे, मराठा समाजासाठी 60 वर्षात कोणी काय केलं यावर खुली चर्चा होऊन जाऊ द्या, प्रसाद लाड यांचे आव्हान
•Prasad Lad Vs Manoj Jarange Patil प्रसाद लाड यांना प्रत्युत्तर देताना जरांगेंची जीभ घसरली
मुंबई :- दोन दिवसांपासून जरांगेविरुद्ध प्रसाद लाड असा सामना पाहायला मिळत आहे. जरांगे पाटील यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर होत असलेल्या सातत्याच्या टीकेवर प्रसाद लाड यांनी एक व्हिडिओ प्रसारित करत यांना इशारा दिला होता. त्यांना देवेंद्र फडणवीस नावाचा आजार झाल्याची अशी खोचक टीका भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केले होते. त्यांच्या या व्हिडिओवर जरांगे पाटील यांच्याकडून जोरदार हल्ला करत प्रसाद लाड यांच्या बाबत बोलताना जरांगे पाटील यांची जीभ घसरली. त्यावर प्रसाद लाड यांच्याकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे प्रसाद लाड म्हणाले की,बाय द वे,मि. जरांगे, साठ वर्षात कोणी काय केले यावर खुली चर्चा होऊन जाऊ द्या असा आव्हान प्रसाद लाड यांनी केले आहे.
प्रसाद लाड यांनी एका पोस्टच्या माध्यमातून जरांगे पाटील यांनी केलेला आरोपवर प्रत्युत्तर दिले आहे. लाड यांना प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे यांनी परभणी जिल्ह्यातील एका युवकाच्या प्रमाणपत्राचा उल्लेख करत, ते प्रमाणपत्र दाखवले होते. तसेच, मराठा आरक्षणाचे प्रमाणपत्र पोलिस आयुक्तांनी रद्द ठरवले असल्याचा आरोप केला होता. मात्र, लाड यांनी जरांगे पाटील यांचा हा आरोप खोडून काढला आहे.बाय द वे, मि. जरांगे,…मराठा समाजाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे, ‘नरेटिव्ह’ची नाही! काल आपण मला शिविगाळ करताना जो आकांडतांडव केला आणि जे प्रमाणपत्र फडणवीसांच्या एसपीने नाकारले असे सांगितले, त्याची मूळ हकिकत जाणून घ्या.
हे प्रकरण ठाणे एसपींच्या हद्दीतील नाही, तर ठाणे पोलिस आयुक्तांच्या हद्दीतील आहे. सखाराम रामचंद्र ढाणे, जिंतूर, परभणी यांनी 2023-2024 चे नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. (6 जून 2024 च्या जाहिरातीनुसार) त्यांच्याकडे 2024-25 या वर्षाचे प्रमाणपत्र होते. त्यामुळे त्यांनी स्वत: एक प्रमाणपत्र भरून खुल्या प्रवर्गातून संधी देण्यात यावी, असे हमीपत्र दिले.
आमची तीच अपेक्षा आहे, तुम्ही योग्य माहिती घेत जा आणि मग बोलत जा. मी पुन्हा सांगतो, मराठा समाजासाठी मी कितीही शिविगाळ ऐकायला तयार आहे. पण, मराठा समाजासाठी 60 वर्षांत कुणी काय केले आणि कुणी काय केले नाही, यावर एकदा खुली चर्चा होऊन जाऊ द्या! असे आव्हानच प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांना दिले आहे.