Worli Bandra Sea Link Suicide News : मृत्यूचे कारण अस्पष्ट; आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय
मुंबई :- मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यावसायिकाने वांद्रे-वरळी सी लिंकवरून Bandra Worli Sea Link समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली असून, व्यावसायिक कारणांमुळे त्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
अमित शांतीलाल चोप्रा (47 वय) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. मंगळवारी मध्यरात्री ते एका टॅक्सीने प्रवास करत होते. त्यांची टॅक्सी सी लिंकवर येताच, त्यांनी अचानक “आपल्याला साप चावला” असा आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे घाबरून टॅक्सी चालकाने गाडी बाजूला थांबवली. त्यानंतर चोप्रा यांनी टॅक्सीचा दरवाजा उघडून थेट सी लिंकवरून समुद्रात उडी मारली.
या प्रकारामुळे घाबरलेल्या टॅक्सी चालकाने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अमित चोप्रा यांचा मृतदेह समुद्रातून बाहेर काढून ताब्यात घेतला. पोलिसांना त्यांच्याकडे कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पोलिसांनी तपासाला सुरुवात केली
अमित चोप्रा हे मूळचे राजस्थानचे रहिवासी असून, मुंबईतील अंधेरी येथे ते पत्नी आणि मुलांसोबत राहत होते. त्यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय होता. पोलिसांनी आता या आत्महत्येचा तपास सुरू केला असून, आर्थिक अडचणी किंवा इतर काही समस्यांमुळे त्यांनी हे पाऊल उचलले का, याचा शोध घेतला जात आहे. लवकरच त्यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…