महाराष्ट्र

Buldhana Political News : सिंदखेड राजात 21 वर्षीय तरुणाचा ‘केमिस्ट्री’त धमाका! सत्तेच्या समीकरणात सौरभ तायडे यांची बाजी; ठरले राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष

Buldhana Nagarpalika Election 2025 Result : प्रचंड पैसा आणि बड्या नेत्यांच्या सभांना तरुणाईने नाकारले; शरद पवार गटाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षाचा विकासाचा नवा संकल्प

बुलढाणा | राज्यातील २४६ नगरपरिषदांच्या निकालात अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला असताना, सिंदखेड राजामधून एका 21 वर्षांच्या तरुणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या या ऐतिहासिक शहरात सौरभ तायडे या उच्चशिक्षित तरुणाने नगराध्यक्ष पदाची माळ आपल्या गळ्यात पाडली आहे. कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नसताना आणि बड्या नेत्यांच्या सभांशिवाय मिळवलेला हा विजय राज्यातील चर्चेचा विषय ठरला आहे.

बड्या नेत्यांच्या सभांवर ‘तरुणाई’ भारी

या निवडणुकीत सिंदखेड राजामध्ये सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. सत्तेत असलेल्या महायुतीने पूर्ण ताकद लावली होती, अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभाही या शहरात पार पडली होती. याउलट, शरद पवार गटाकडून एकाही मोठ्या नेत्याची सभा सौरभसाठी झाली नव्हती. मात्र, सिंदखेड राजाच्या नागरिकांनी आणि विशेषतः तरुणांनी सौरभच्या ‘व्हिजन’वर विश्वास ठेवत त्याला भरघोस मतांनी निवडून दिले.
शिक्षण आणि राजकारणाचा मेळ
एम.एस्सी. केमिस्ट्री (M.Sc. Chemistry) पूर्ण केलेले सौरभ सध्या बी.एड. चे शिक्षण घेत आहेत. राजकारणाचा फारसा गंध नसतानाही शहराच्या रखडलेल्या विकासासाठी त्यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. 21 व्या वर्षी ही जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी स्पष्ट केले की, “शहराच्या विकासासाठी माझ्याकडे नवीन व्हिजन असून, शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी सिंदखेड राजाचा कायापालट करण्याचा प्रयत्न करेन.”

रखडलेला विकास आराखडा हेच लक्ष्य

सिंदखेड राजा हा ऐतिहासिक वारसा लाभलेला भाग आहे. 15 वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी या शहरासाठी विकास आराखड्याची घोषणा केली होती, मात्र तो अद्याप कागदावरच आहे. हा रखडलेला विकास आराखडा पूर्ण करणे आणि जिजाऊंच्या जन्मभूमीला जागतिक दर्जाच्या सुविधा मिळवून देणे हे आपले प्रथम प्राधान्य असल्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौरभ तायडे यांनी सांगितले.

कमी वयात नगराध्यक्ष होण्याचा मान
राज्यात यंदाच्या निवडणुकीत कमी वयात नगराध्यक्ष होणारे सौरभ तायडे हे एकमेव नाहीत. सोलापूर जिल्ह्यातील सिद्धी वस्त्रे या 22 वर्षांच्या तरुणीनेही नगराध्यक्षपदी विजय मिळवून तरुणाईचा ठसा उमटवला आहे. शिक्षणासोबतच समाजकारणात उतरणाऱ्या या तरुणांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता नवा जोम पाहायला मिळणार आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

39 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago