क्राईम न्यूज

Bribe News : अहिल्यानगर हादरलं! महसूल अधिकाऱ्याला ₹8,000 लाच स्विकारताना रंगेहात पकडले

अहिल्यानगर | पारनेर तालुक्यातील वाडेगव्हान येथील ग्राम महसूल अधिकारी दिपक मिमाजी साठे (वय ३६) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले. Ahilyanagar ACB Trap News

तक्रारदाराच्या मुलगा व पुतण्यांच्या नावावर जमिनीची नोंद सातबारा उताऱ्यावर करून देण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने ₹10,000 लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर रक्कम ₹8,000 ठरली.
१७ सप्टेंबर रोजी, पंचासमक्ष लाच स्वीकारताना साठे याला सापळा कारवाईत गजाआड करण्यात आले.

▪️ तक्रार आल्यानंतर त्याच दिवशी पडताळणी झाली.
▪️ सातबारा नोंद करण्याच्या बहाण्याने आरोपी अधिकाऱ्याने तक्रारदाराकडून रक्कम मागितली.
▪️ पंचासमक्ष प्रत्यक्ष ₹8,000 रोख स्वीकारताना साठे हाती लागला.

पोलिसांची चमकदार कामगिरी

ही कारवाई पोलीस निरीक्षक राजु आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस उप अधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली.
पथकात पोना. चंद्रकांत काळे, शेखर वाघ, किशोर कुळधर आणि पोहेकॉ. दशस्थ लाड यांनी सहभाग घेतला.

कायदेशीर कारवाई

आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे.

जनतेसाठी आवाहन

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आवाहन –
“जर कोणीही सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच मागत असेल, तर त्वरित तक्रार करा. भ्रष्टाचाराविरुद्धच्या या लढ्यात प्रत्येक नागरिकाने पुढे यावे.”

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

16 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

16 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

21 hours ago