मुंबईमहाराष्ट्र
Trending

Breaking News : दोन माजी आमदारांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, कोकणात भाजपला मोठा धक्का!

Deepak Salunkhe join Shivsena Thackeray Group  : रत्नागिरी भाजपाचे नेते माजी आमदार राजन तेली आणि सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, अँजिओप्लास्टीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच प्रसारमाध्यम आणि कार्यकर्त्यांसमोर

मुंबई :- भाजपला मोठा धक्का बसला असून‌ राज्यातील महत्त्वाचे भाजपचे नेते ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपचे दोन माजी आमदार तसेच नेते यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत हाती मशाल घेतली आहे. रत्नागिरीतील भाजपाचे नेते माजी आमदार राजन तेली आणि सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे (Deepak Salunkhe) यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे संजय राऊत आदित्य ठाकरे उपस्थित होते. मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते मातोश्रीवर उपस्थित राहून त्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला आहे. तसेच सिल्लोड मतदार संघातील भाजपचे नेते सुरेश बनकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सुरेश बनकर विधानसभेला उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे हे अँजिओप्लास्टीनंतर पहिल्यांदाच प्रसारमाध्यम आणि कार्यकर्त्यांसमोर आलेले पाहिला मिळाले. तसेच उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळत आहे. Maharashtra Vidhan Sabha Latest News

पक्षप्रवेशादरम्यान उद्धव ठाकरे काय म्हणाले?

उद्धव ठाकरे म्हणाले, मध्यंतरी हॉस्पिटलची वारी करावी लागली होती. डॉक्टरांनी आराम करण्यास सांगितले होते, पण हरामान घालवायचे असल्यामुळे आराम तरी किती दिवस करणार, असे म्हणत त्यांनी महायुतीवर टीका केली. दीपक साळुंखे आणि राजन तेली यांच्या पक्षप्रवेशामुळे कामाला मुहूर्त चांगला मिळाला आहे. यंदाची निवडणूक सोपी नाहीये. दीपक साळुंखे शिवसेनेत आले म्हणजे आपला विजय नक्की हे माहीत आहे. पण तुम्ही आजपासून मतदारसंघातील घराघरांत आपली मशाल पोहोचवली पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.सांगोल्याची जनता माझ्यासोबत आहे हे तुम्ही दाखवून द्याल खोकेवाले मशाल आणि धनुष्यबाण यामध्ये संभ्रम निर्माण करतात. त्यामुळे शिवसेनेची निशाण मशाल असून ती घराघरांत न्यावी लागेल, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केले. दीपक साळुंखे यांच्या हातात मशाल दिली आहे, त्या मशालीची धग दाखवून द्यायची आहे. मतदारसंघात सभेला आल्यानंतर सविस्तर बोलेन, असेही ठाकरे म्हणाले. सांगोल्याचा निवडून आलेला आमदार जरी गद्दार झाला, तरी सांगोलेकर माझ्यासोबत आहात हे दाखवून द्याल आणि आपला आमदार निवडून आणाल अशी खात्री आहे, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. Maharashtra Vidhan Sabha Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0