Breaking News : मुंबई उच्च न्यायालयाने डीयूचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा यांची निर्दोष मुक्तता केली, जन्मठेपेची शिक्षाही रद्द
G N Saibaba : मुंबई उच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय दिला आहे. डीयूचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
ANI :- मुंबई उच्च न्यायालयाने डीयूचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा यांची निर्दोष मुक्तता केली असून त्यांची जन्मठेपेची शिक्षा रद्द केली आहे. आज (मंगळवार) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने माओवादी गटांशी संबंध असल्याचा आरोप करणाऱ्या बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) एका प्रकरणात दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा आणि इतर पाच जणांची शिक्षा रद्द केली आहे. न्यायमूर्ती विनय जोशी आणि वाल्मिकी एसए मिनेझिस यांनी याप्रकरणी मोठा निर्णय दिला आहे.जीएन साईबाबा G N Saibaba आणि त्यांच्या सहआरोपींना 2014 मध्ये माओवादी गटांशी संबंध असल्याच्या आणि भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती.
जीएन साईबाबा, हेम मिश्रा, महेश तिर्की, विजय तिर्की, नारायण सांगलीकर, प्रशांत राही आणि पांडू नरोटे (मृत) यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने माओवादी लिंक प्रकरणात निर्दोष मुक्तता केली आहे.
या प्रकरणी सरकारची बाजू सर्वोच्च न्यायालयात अपील करेल, अशी अपेक्षा आहे. याबाबत सरकारी पक्षाचे वकील शक्यता विचारात घेत आहेत. जीएन साईबाबा सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहेत. न्यायालयाने जीएन साई बाबा आणि इतर पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या आरोपींना 50 हजार रुपयांच्या दंड भरून सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाचा हा निर्णय राज्य सरकार आणि पोलीस दलासाठी मोठा धक्का आहे.