Breaking News: Mumbai Police Deploys Massive Force for Election Control
लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालादिवशी तगडा पोलीस बंदोबस्त
•पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष जबाबदारी, मतमोजणी केंद्रावर बाहेरील व्यक्तीस प्रवेश बंदी
मुंबई :– केंद्रात कोणाचे सरकार स्थापन होणार इंडिया आघाडी जागा आधी घेणार का एनडीए पुन्हा एकदा सर्कस स्थापन करणार अशी परिस्थिती केंद्रात आणि राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना लागला आहे. मुंबईत ठाकरे विरुद्ध शिंदे आणि भाजप असे सामना रंगला आहे. मुंबईत उद्या हाय व्होल्टेज राजकारण दिसणार आहे राजकीय निकालानंतर अति उत्साह होणार आहे त्यामुळे कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे.
मुंबईत तीन ठिकाणी मतमोजणी केंद्र तैनात केले आहे. मेस्को,विक्रोळी आणि शिवडी येथे मतमोजणी होणार आहे. शहरामध्ये कायदा सुव्यवस्था अबतीत राखण्याकरिता पोलीस आयुक्त मुंबई विशेष पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्त यांच्या देखरेखीखाली मोठा फौज फाटा मुंबई तैनात करण्यात आला आहे. तसेच तिन्ही मतं केंद्राच्या बाहेर तीनशे मीटर परिसरात दिनांक 2 जून ते 05 जून मध्यरात्रीपर्यंत कर्मचारी तसेच मतमोजणी संदर्भातील राजकीय नेतेमंडळी यांच्या व्यतिरिक्त सर्वसामान्यांना कोणत्याही प्रकारे प्रवेश देण्यास मनाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता ठोक पावले उचलण्यात आले आहे.