ब्रेकिंग न्यूज: ठाण्यातील टेंभी नाक्यावर बनावट जन्म व शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रांचा गोरखधंदा उघड

ठाणे : ठाणे येथील टेंभी नाका परिसरात बनावट जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रांचा गोरखधंदा उघडकीस आला आहे. ही कारवाई सामाजिक कार्यकर्ते डॉ. बिनू वर्गीस यांच्या माहितीच्या आधारे करण्यात आली. Thane Crime News
आनंद दिघे आश्रमामागे बेकायदेशीर कृत्ये सुरू असल्याची खबर मिळाल्यावर डॉ. वर्गीस यांनी झोन १ चे डीसीपी सुभाष भुर्से यांना सतर्क केले. त्यानंतर ठाणे नगर पोलीस स्टेशनचे Thane Nagar Police Station वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांनी पीएसआय दीपक खेडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाला कारवाईचे निर्देश दिले.पोलीस पथकाने परस ग्राफिक्स, कॉम्प्युटर टायपिंग आणि झेरॉक्स सेंटरवर छापा टाकला आणि एका महिलेला बनावट जन्म प्रमाणपत्र देताना रंगेहाथ पकडले. Thane Fake Certificate Latest News
या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी डॉ. वर्गीस यांनी स्वतःचे नाव, बिनू एन. वर्गीस, दस्तऐवजासाठी दिले. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांना अवघ्या ३० मिनिटांत आणि केवळ १,००० रुपयांत महाराष्ट्र सरकार, आरोग्य विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) यांच्या नावाखाली बनावट जन्म प्रमाणपत्र मिळाले.एफआयआर नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. या दस्तऐवज बनावट रॅकेटमागील मोठ्या नेटवर्कचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.


