क्राईम न्यूजपुणे
Trending

Breaking News : खेड शिवापुर टोल नाक्यावर पाच कोटीची रोकड जप्त, निवडणूक अधिकारी आणि पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

Pune Breaking News : काय बापू..किती खोके? खासदार संजय राऊत यांच्याकडून टीका

पुणे :- राज्यात विधानसभा निवडणुकीची Maharashtra Vidhan Sabha Election रणधुमाळी उडाली असताना एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात तिकीट वाटपाचे सत्र चालू आहे. तर पुण्यात निवडणूक आयोग आणि पुणे पोलिसांनी Pune Police काल (21ऑक्टोबर) मध्यरात्री मोठी कारवाई करत पुण्यातील खेड शिवापुर टोल Khed Shivapur Toll Naka नाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी Pune Gramin Police पाच कोटी रूपयांची रोख रक्कम पकडली. ही गाडी सांगोल्यातील असल्याचीही माहिती समोर आली आहे. यावरुनच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह महायुतीवर गंभीर आरोप केले आहेत. Pune Breaking News

खासदार संजय राऊत यांचे गंभीर आरोप

मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर 15 कोटी सापडले! हे आमदार कोण? काय झाडी…काय डोंगर….मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले
15 कोटी चा हा पहिला हप्ता!काय बापू..किती हे खोके?

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे

काय बापू… काय प्रचार… काय खोके… समदं कसं ओके दिसलं.. पण तरीही निवडणुक आयोग ढुंकून सुध्धा तुमच्याकडे बघणार नाही.. कुठून आला एवढा पैसा ED, EC, ब्र सुध्धा काढणार नाही… तसा आदेशच आहे म्हणे महशक्तीचा…!!

गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आले आहे. तसेच सांगोल्याचे आमदार शहाजी बापू यांनी यासंदर्भात आपल्याला माहीत नसल्याचे सांगितले असून त्या घटनेची आपला काही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0