Borivali Rape News : बोरिवलीतील कलयुगी बापाचे घृणास्पद कृत्य, 6 वर्षांपासून मुलींवर बलात्कार करत होता, आईचा खुलासा
Borivali Rape News: तक्रार दाखल करताना पीडित मुलींच्या आईने सांगितले की, 40 वर्षीय आरोपी वडील गेल्या सहा वर्षांपासून म्हणजेच 2019 वर्षांच्या आपल्या 9 आणि 10 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करत आहेत.
मुंबई :- माणुसकी आणि नात्याला लाजवेल अशी घटना बोरिवली परिसरात उघडकीस आली आहे. येथे एक क्रूर बाप गेल्या सहा वर्षांपासून आपल्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करत होता. Rape बोरिवली पोलिसांनी आता पॉक्सो Borivali Police कायद्यांतर्गत तक्रार नोंदवून आरोपी वडिलांना अटक केली आहे.
पीडित मुलींच्या आईने बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, 2019 पासून हा प्रकार सुरू आहे. 40 वर्षीय आरोपी वडील गेल्या सहा वर्षांपासून म्हणजेच 2019 पासून आपल्या 9 आणि 10 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पत्नी विरोध करत असताना तिला मारहाण करायचा, याला कंटाळून महिलेने आता बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून बोरिवली पोलिसांनी BNS च्या कलम 64 (2)(f), 64 (2) (m), 115 (2), 351 (2) आणि POCSO च्या कलम 6 आणि 10 नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली असून आता पीडित मुलींची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.