ठाणेमुंबई
Trending

Bollywood News : वडिलांच्या नाजूक प्रकृतीमुळे चिडला ‘सनी पाजी’! धर्मेंद्र यांच्या घराबाहेर पॅपाराझींवर संतापला

Sunny Deol On Paprazi : “तुम्हाला लाज वाटत नाही का?” म्हणत सनी देओलने माध्यमांना फटकारले; व्हिडीओ व्हायरल

मुंबई :- ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती सध्या नाजूक असून, तब्बल बारा दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या त्यांच्या मुंबईतील जुहू येथील घरीच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पत्नी हेमा मालिनी, मुलगी ईशा देओल, अमिताभ बच्चन आणि अनेक सिनेकलाकारांनी घरी येऊन त्यांची भेट घेतली आहे. या भेटींमुळे आणि त्यांच्या चाहत्यांच्या चिंतेमुळे धर्मेंद्र यांच्या घराबाहेर चाहते आणि पॅपाराझींची मोठी गर्दी झाली आहे. Sunny Deol Angry On Paparazzi

याच गर्दीमुळे धर्मेंद्र यांचे मोठे सुपुत्र आणि अभिनेते सनी देओल यांचा संयम सुटला आणि गुरुवारी सकाळी ते पॅपाराझींवर प्रचंड संतापले. त्यांचा हा संतापलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सनी देओलचा संताप

देओल कुटुंब आणि त्यांच्या टीमने वारंवार माध्यमांना त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती केली असतानाही पॅपाराझी धर्मेंद्र यांच्या जुहूमधील घराबाहेर गर्दी करत आहेत.

सनी देओल जेव्हा त्यांच्या वडिलांना भेटण्यासाठी घरी पोहोचला, तेव्हा तो चिंतेत आणि दुःखात दिसत होता. मान खाली घालून चालत असताना, एका पॅपाराझीने “हा सनी देओल आहे…” असे ओरडताच, चिंतेत असलेला सनी देओल चिडला.

संतापलेल्या सनी देओलने पॅपाराझींसमोर उभे राहून हात जोडले आणि त्यांना फटकारले.

व्हिडीओमध्ये सनी देओल पॅपाराझींना म्हणतोय, “तुम्हाला लाज वाटत नाही का? तुमच्या घरी आई-वडील आणि मुलं आहेत. तुम्ही त्यांच्यासाठी असे व्हिडीओ बनवताय आणि पाठवताय… तुम्हाला लाज वाटली पाहिजे…”

वडिलांच्या नाजूक प्रकृतीमुळे चिंतेत असलेल्या सनी देओलचा हा राग सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0