Bollywood Drugs Party Latest News : 250 कोटींच्या अमली पदार्थांच्या प्रकरणात मोठी माहिती; अनेक दिग्गज सेलिब्रेटी पोलिसांच्या रडारवर
मुंबई :- मुंबई पोलिसांच्या Mumbai Police अमली पदार्थविरोधी पथकाने (ANC) आंतरराष्ट्रीय ड्रग्ज टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर, संयुक्त अरब अमिरातीमधून (UAE) प्रत्यार्पण करून आणलेला कुख्यात अमली पदार्थांचा सूत्रधार मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेख याने चौकशीत मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. सलीम शेख याने हिंदी सिनेसृष्टीतील (बॉलिवूड) प्रसिद्ध कलावंत आणि राजकीय व्यक्तींसाठी अमली पदार्थांच्या मेजवान्या आयोजित केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. यामुळे अनेक दिग्गज कलाकार आणि नेते पोलिसांच्या रडारवर आले आहेत. Mumbai Latest Crime News
250 कोटींच्या प्रकरणाचा सूत्रधार
सलीम शेख हा यूएईमध्ये राहून भारतात अमली पदार्थांचे मोठे व्यवहार चालवत होता. सुमारे 250 कोटी रुपयांचे हे संपूर्ण प्रकरण एका महिलेच्या अटकेनंतर समोर आले. फेब्रुवारी 2024 मध्ये मुंबई पोलिसांनी कुर्ला येथून परवीन बानो गुलाम शेख या महिलेला 25 कोटी रुपयांच्या मेफेड्रॉन (एमडी) सह अटक केली होती. या तपासामध्ये सलीम शेख हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीतील मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले. तो महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मेफेड्रॉनचे उत्पादन आणि पुरवठा करत होता.
सेलिब्रेटी आणि राजकारण्यांसाठी आलिशान मेजवान्या
आरोपी मोहम्मद सुहेल शेख याने पोलीस चौकशीत कबूल केले की, त्याने मुंबई, गोवा तसेच दुबई येथे हिंदी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार आणि राजकीय नेते यांच्यासाठी आलिशान ‘ड्रग्ज’ मेजवान्या आयोजित केल्या होत्या. या मेजवान्यांमध्ये अमली पदार्थांचा पुरवठा केला जात असे.
सलीमने नाव घेतलेले राजकारणी आणि सेलिब्रेटी आता पोलिसांच्या रडारवर आले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. पोलीस या व्यक्तींचे अन्य तस्करांशी संबंध आहेत का, त्यांनी यापूर्वी आयोजित मेजवान्यांमध्ये सहभाग घेतला आहे का, तसेच या खर्चिक मेजवान्यांसाठीच्या पैशाचा स्रोत काय होता, याचा तपास करत आहेत. अमली पदार्थांचे हे जाळे आता थेट उच्चभ्रू वर्गापर्यंत पोहोचल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत जवळपास 15 जणांना अटक केली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…