Bollywood Breaking News : ‘बेस्ट डील टीव्ही’मध्ये 60 कोटींची गुंतवणूक वैयक्तिक खर्चासाठी वापरल्याचा दावा; जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मुंबई :- बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी Shilpa Shetty आणि तिचा पती, उद्योगपती राज कुंद्रा Raj Kundra यांच्यावर एका मुंबईस्थित व्यावसायिकाने तब्बल 60.48 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
व्यवसायी दीपक कोठारी यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी 2015 ते 2016 या कालावधीत शिल्पा-राज यांच्या ‘बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीमध्ये व्यवसाय वाढवण्यासाठी 60.48 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, ही रक्कम कंपनीच्या कामकाजासाठी न वापरता, ती वैयक्तिक खर्चासाठी वापरण्यात आल्याचा दावा कोठारी यांनी केला आहे.
तक्रारीत कोठारी यांनी म्हटले आहे की, 2015 मध्ये ते एजंट राजेश आर्य यांच्या माध्यमातून शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या संपर्कात आले होते. त्यावेळी शिल्पा शेट्टी कंपनीच्या संचालक होत्या आणि त्यांच्याकडे कंपनीचे 87 टक्क्यांहून अधिक शेअर्स होते. सुरुवातीला त्यांनी 75 कोटी रुपयांचे कर्ज देण्याची तयारी दर्शवली होती, परंतु नंतर ती रक्कम गुंतवणूक म्हणून देण्याचा निर्णय घेतला.
कोठारी यांनी एप्रिल 2015 मध्ये 31.15 कोटी रुपयांचा पहिला हप्ता आणि त्यानंतर जानेवारी 2016 ते मार्च 2016 दरम्यान 28.54 कोटी रुपये दिले. तसेच, 3.19 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी म्हणून भरले. एप्रिल 2016 मध्ये शिल्पा शेट्टी यांनी स्वतः वैयक्तिक हमीपत्र दिले होते. मात्र, त्यानंतर काही महिन्यांतच सप्टेंबर 2016 मध्ये त्यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला. कोठारी यांना कोणतीही कल्पना नसताना, लवकरच कंपनीविरुद्ध 1.28 कोटी रुपयांचा दिवाळखोरीचा खटला दाखल झाला. वारंवार मागणी करूनही गुंतवलेली रक्कम परत न मिळाल्याने अखेर कोठारी यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
या आरोपांवर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…