BMW Hit And Run Case : बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणात आरोपीचे वडील आणि शिवसेना नेत्याला जामीन मंजूर
मुंबई हिट अँड रन प्रकरणातील आरोपीचे वडील शिवसेना नेते राजेश शहा यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
मुंबई :- बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणात शिवसेना नेते आणि आरोपीचे वडील राजेश शहा यांना जामीन मिळाला आहे. न्यायालयाने त्यांना 15 हजार रुपयांच्या तात्पुरत्या रोख रकमेवर जामीन मंजूर केला आहे.
वरळी बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपीचे वडील राजेश शहा आणि अटक करण्यात आलेला चालक राजर्षी राजेंद्रसिंग बिदावत यांना आज मुंबईतील शिवडी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीने वडिलांशी फोनवर अनेकवेळा बोलल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.
बीएनएस कलम 105 अंतर्गत जामीन दिला जाऊ शकतो की नाही याविषयी न्यायालयात वाद झाला आणि न्यायालयाने काही काळ विश्रांती घेतली. पोलिसांनी सांगितले की, अपघातानंतर मुख्य आरोपी मिहीरने वडिलांना फोन केला आणि त्यानंतर राजेशने ड्रायव्हर राजऋषी आणि मिहीर यांना जागा बदलण्यास सांगितले.