मुंबई

BMC Election 2025 : मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय भूकंप? मनसेसाठी ‘मविआ’चे दरवाजे उघडणार?

उद्धव-राज युतीसाठी शरद पवार ‘सकारात्मक’; काँग्रेसची स्वबळाची भूमिका मागे पडणार का?

मुंबई :- आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election 2025) पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे (MNS) अर्थात ठाकरे बंधूंची युती जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र, या संभावित युतीमुळे महाविकास आघाडीत (MVA) मतभेद उघड झाले आहेत. मनसेशी वैचारिक मतभेद असल्याने मुंबई काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.

परंतु, महायुतीला (शिंदे-फडणवीस-अजित पवार) टक्कर देण्यासाठी विरोधकांची वज्रमूठ अधिक घट्ट करण्याच्या दृष्टीने आता खुद्द शरद पवार यांनी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे.

शरद पवारांचा महत्त्वाचा सल्ला

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र लढवली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रमुख शरद पवार यांचे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना थेट सवाल केला.”मतदार यादीच्या घोळाच्या संदर्भात आणि मतचोरीच्या संदर्भात एकत्रित येत सत्याचा मोर्चा काढता आणि मग निवडणूक का वेगळी लढवता?”

सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) सोबत घेऊन निवडणूक लढवण्याच्या संदर्भात शरद पवार सकारात्मक आहेत. म्हणजेच, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास, ‘मविआ’ त्यांना स्वीकारायला तयार असल्याचे संकेत मिळत आहेत.

काँग्रेस आणि राऊत यांची पूर्वीची भूमिका

काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष आघाडी करताना एक किमान समान कार्यक्रम समोर ठेवतो आणि त्यांच्यासाठी संविधान हा समान धागा राहिलेला आहे. त्यामुळे मनसेला सोबत घेण्यासाठी काँग्रेसला आपले मतभेद बाजूला ठेवावे लागतील.

यापूर्वी दोन महिन्यांपूर्वी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी ‘मविआ’ म्हणून नव्हे, तर स्थानिक पातळीवर स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याची भूमिका मांडली होती. मात्र, त्यांनी ठाकरे बंधू एकत्र आल्यास शुभेच्छा देण्याची भूमिका घेतली होती.

शरद पवारांच्या या भूमिकेनंतर, मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केलेली काँग्रेस आपला निर्णय मागे घेते का आणि राज ठाकरे ‘मविआ’चा भाग होतात का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

16 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

16 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

21 hours ago