भाजपचे ज्येष्ठ नेते लियाकत शेख यांचा भाजपाला सलाम!
•मुस्लिम नेत्याचे भाजपाला सोडचिठ्ठी; नितेश राणे यांच्या वक्तव्याला कंटाळून पक्ष सोडल्याचा केला आरोप
मुरबाड :- मुरबाड तालुक्यातील देहेरी तळेखल ग्रुपग्रामपंचायतीचे माजी सरपंच व राज्य-जिल्हास्तराव राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्य करणारे 40 वर्षे भाजपाचे निष्ठनेने काम करणारे भाजपा नेते लियाकत शेख यांनी मुरबाड येथील शासकीय विश्रामगृह येथील आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा पक्ष सदस्यत्वाचा पक्षनेतृत्वाकडे राजीनामा दिल्याचे घोषित केले.
आमदार नितेश राणे प्रेषित मुहंमद पैगंबरांविषयी जे बोलतात, मुस्लीमांना मस्जीदमध्ये घुसून मारण्याची धमकी देतात, अश्लिल भाषेत मुस्लिमांना शिव्या देतात. मात्र पक्षनेवृत्व त्यांना याबाबत थांबवत नाही. म्हणजे एक प्रकारे पक्षनेवृत्व त्यांना प्रोत्साहनच देत आहेत. असे वागणे लोकशाही व राष्ट्रीय एकात्मतेला धोकादायक असुन संविधानाला फाट्यावर मारणारे आहे. म्हणून आ. निलेश राणे यांचा मी धिक्कार करीत असुन निषेध व्यक्त करतो असे भाजपचे ज्येष्ठ नेते लियाकत शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राजीनाम्याबाबत नितिन गडकरी साहेब, चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, रविंद्र चव्हाण साहेब, जगन्नाथ पाटील माजी मंत्री, माजी खासदार कपिलजी पाटील साहेब, किसन कथोरे साहेब, संजय केळकर, माजी आमदार नरेंद्र पवार यांन पूर्व कल्पाना दिल्याचे प्रा. लियाकत शेख यांनी पत्रकारांना सांगितले. तसेच पक्षाचे अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाला सिद्दीकी प्रदेश अध्यक्ष इद्रीस मुलतानी, हाजी अराफत, हैदर आजम, डॉ. अहमद राणा यांनाही भाजपा सोडण्याचे अवाहन केले आहे.
पुढील उरलेल्या आयुष्यात माजी आमदार कै. दिगंबरजी विशे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकरी, कामगार, गोरगरीब व सर्वसामान्यांसाठी पूर्णवेळ काम करणार असुन ज्या पक्षात मी जाईन तेथे पक्षसंघटना बांधण्याचे प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपचे ज्येष्ठ नेते लियाकत शेख हे प्रशासन व कायद्याचे ज्ञान असलेले अहोरात्र सर्वसामान्यांसाठी धावणारे अभ्यासू व न्यासंगी कार्यकर्ते भाजपाने दुरावलेले असुन मुस्लीम मुक्त भाजपा चा कार्यक्रम भाजपा राबविणार आहे का ? अशी चर्चा राजकीय गोटात सुरू आहे.