छत्रपती संभाजी नगर

BJP Vs Thackeray Group : संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि भाजप आमने-सामने

•आदित्य ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेल बाहेर भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, दिशा सालियन यांच्या प्रकरणातवर भूमिका स्पष्ट करावी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर :- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गट आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या अंगावर धाव घेतल्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांना अखेर लाठीचार्ज देखील करावा लागला. या सर्व प्रकरणामुळे संभाजीनगर मधील वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. आदित्य ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेल बाहेर हा सर्व प्रकार घडला. आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन यांच्या प्रकरणातवर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्याने हा सर्व प्रकार घडला.त्यामुळे भाजपच्या महिला पदाधिकारी येथे आल्या आहेत. दिशा सालियन यांच्या मर्डर केसचे काय झाले? याचा जाब आम्ही विचारणार असल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांनी या वेळी म्हटले आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी सरकारचा निषेध केला. लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्यांवर अशा पद्धतीने लाठीचार्ज होणे ही गुंडशाही आहे. हे खपवून घेतले जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपच्या गृहमंत्र्यांनी दिशा मृत्यू प्रकरणात एसआयटीची नियुक्ती केली होती.भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याच मंत्र्यांना या विषयी काय झाले? हा प्रश्न विचारावा, असे आव्हान देखील अंबादास दानवे यांनी दिले आहे.

दिशा सालियन नेमके काय प्रकरण आहे?

दिशा सालियन ही अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती. दिशा सालियनच्या मृत्यूनंतर पाच दिवसांनी सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याच्या वृत्ताने मोठी खळबळ उडाली होती. भाजप आमदार नितेश राणे यांनी या दोन्ही मृत्यूंचा एकमेकांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. मात्र सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्याच केली होती, असे सीबीआयच्या तपासाअंती स्पष्ट केले होते.28 वर्षीय दिशा सालियन ही मालाड येथे राहत होती. 8 जून 2020 रोजी तिचा मृत्यू झाली होता. मालाड येथील गॅलेक्सी रिजंट या इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन दिशा सालियन खाली कोसळली होती. दिशा नेमकी खाली कशी पडली की, तिला कुणी ढकलले?, यावर वाद होता. अखेर या वादावर पडदा टाकण्यात आला होता. दिशा सालीयन हिचा मृत्यू हा अपघातीच होता. तोल गेल्याने 14 व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला, असे तपासाअंती अहवालात स्पष्ट झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0