BJP Meeting : राजकीय गदारोळ वाढला, पाच तास चालली भाजपची बैठक, विधानपरिषद निवडणुकीचे हे समीकरण ठरणार का?
BJP Meeting रात्री उशिरा भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुमारे पाच तास चालली. या बैठकीत आगामी निवडणुकीसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
मुंबई :- मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या गोंधळाचे वातावरण असतानाही भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ओबीसींच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली.मुंबईत भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. ही बैठक पाच तास चालली, रात्री 8 वाजता सुरू होऊन पहाटे 1 वाजता संपली. यावेळी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी अनेक महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली.याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली आहे. बैठकीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे.
यावेळी बोलतांना त्यांनी बैठकीत काय घडले याबाबत सांगितले आहे. “लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही एक विश्लेषणात्मक बैठक होती. ज्या ठिकाणी आम्ही मागे पडलो, त्या ठिकाणी पुन्हा एकदा संघटना वाढवणार आहे. केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना या समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता काय केले पाहिजे, यावर चर्चा केली”, असे बावनकुळे म्हणाले.
विधान परिषदेच्या निवडणुकांवरही चर्चा यावेळी विधानपरिषदेबाबत देखील बावनकुळे यांनी माहिती दिली आहे. ” बैठकीत विधान परिषदेच्या निवडणुकांवरही चर्चा झाली. सामाजिक भौगोलिक परिस्थितीच्या आधारावर आणि आणखी काही निकष लावून चर्चा झाली. आम्ही यादी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ” उद्धव ठाकरे कधीही मंत्रालयात आले नाहीत. कधीही मोदींशी चर्चा केली नाही आणि त्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान झाले. आम्हाला नरेंद्र मोदी नको, आम्हाला मोदींचे सरकार चालत नाही या भूमिकेतून ते काम करत होते. म्हणून जनतेचे नुकसान झाले. दोन्हीकडे एका विचाराचा सरकार असेल तर जनतेचा फायदा होईल”, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.केंद्राकडे पाठवू आणि केंद्र त्यावर निर्णय घेईल”, असे बावनकुळे म्हणाले.