काय झाडी…….काय डोंगार…..महायुतीमध्ये एकदम ओके….आघाडीत…. भाजपचे नेते आशिष शेलार यांची महाविकास आघाडीवर टीका

BJP Leader Ashish Shelar Target MVA : भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी कविताच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांनवर निशाणा साधला
मुंबई :- भाजपचे नेते आमदार आशिष शेलार Ashish Shelar यांनी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या खास करून ठाकरे गटाच्या नेत्यांना कविता च्या माध्यमातून टीका करण्याचे परंपरा चालू केली आहे. चुकले आमच्या नानांचे ठोके.. काय झाडी.. काय डोंगर… महायुतीमध्ये सर्व काही ओके.. असे म्हणत काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे काही असे म्हणत काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. नाना पटोले यांच्या कारचा अपघातानंतर काँग्रेस नेत्यांनी हा घातपात असल्याचे टीका करण्यास सुरुवात केली त्यानंतर भाजपाकडूनही त्याला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. त्यालाच भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट माध्यमातून कविता पोस्ट करत टीका केली आहे.
आमदार आशिष शेलार यांची टीका
चुकलेत आमच्या नानांचे ठोके!
काय झाडी..!….काय डोंगार…!!
महायुतीमध्ये एकदम ओके..!
आघाडीत एकमेकांना
एकमेकांचेच धोके! …वर्षानुवर्षे काँग्रेसला
काँग्रेसनेच हरवलं
त्यातच आता उबाठा गटाला घ्यायचे ठरवलं…..या गटाच्या मैत्रीला तर
दुष्मनाची ही नाही येणार सर
ऐक काँग्रेस, आता तू कर्माने मर !….साहेबांच्या गटाची
तर काय सांगावी ख्याती?
गावभर भांडणं लागली की,
साहेब म्हणणार
आपली ताई आणि आपली बारामती !….काय झाडी..
काय डोंगार
एकदम सगळं कसं ओके
काँग्रेसमध्ये चुकलेत आमच्या नानांचे ठोके!