BJP Hat-Trick Win At Haryana : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे.
ANI :- हरियाणा विधानसभा निवडणुकीचे Haryana Vidhan Sabha Election निकाल आले आहेत. येथे भाजप पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. येथे भाजपने 48 जागा जिंकल्या आहेत, काँग्रेसने 37 जागा जिंकल्या आहेत, तर इतरांनी 3 जागा जिंकल्या आहेत. अभय चौटाला यांच्या पक्ष आयएनएलडीला दोन जागा मिळाल्या आहेत.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
हरियाणातल्या जनतेने तिसऱ्यांदा भाजपावर विश्वास टाकला आहे. तसंच आम्हाला भरभरुन मतदान केलं आहे. हरियाणातल्या जनतेने इतिहास रचला आहे. आपल्या देशात अनेक राज्यं अशी आहेत ज्यांनी कधीही काँग्रेसला सलग दोनदा सत्ता दिली नाही. पण भाजपावर तो विश्वास टाकला. हरियाणामध्ये भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता दिली. हरियाणात जेव्हापासून निवडणूक होऊ लागली तेव्हापासून हे पहिल्यांदाच घडतं आहे. काँग्रेससाठी अनेक राज्यांनी नो एंट्रीचा बोर्ड लावला आहे. त्यांच्या खोट्या आश्वासनांना जनता भुलत नाही. आधी त्यांना वाटायचं की काहीही केलं नाही तरीही आपली सत्ता येईल. पण आता तशी स्थिती नाही. लोकांनी काँग्रेसला नाकारलं आहे.
काँग्रेसचा डबा गुल झाला आहे, तसंच त्यांचं पितळ उघडं पडलं आहे. काँग्रेस सत्तेला आपला जन्मसिद्ध अधिकार मानते. सत्ता नसेल तर काँग्रेसची अवस्था ही जल बिन मछली सारखी म्हणजेच पाण्याशिवाय तडफडणाऱ्या माशासारखी होते. त्यामुळे ते सत्तेत आल्यानंतर देशाला, समाजाला पणाला लावतात. त्याचं त्यांना काहीही वाटत नाही. आज संपूर्ण देश पाहतो आहे की काँग्रेस आपल्या समाजात जातीभेदाचं विष कालवते आहे. जे लोक सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मले, फाईव्ह स्टार आयुष्य पिढ्या न पिढ्या जगत आहेत ते आता गरीबांना जातीच्या नावावर लढवू पाहात आहेत. आपल्या दलित, आदिवासी आणि मागासवर्गाने हे मुळीच विसरु नये.