Jammu & Kashmir Election Update : भाजपने जम्मू-काश्मीर निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, 44 जागांवर उमेदवार दिले
•BJP has released its first list of candidates for the Jammu and Kashmir elections जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत
ANI :- जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 44 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने पहिल्या टप्प्यासाठी 15, दुसऱ्या टप्प्यासाठी 10 आणि तिसऱ्या टप्प्यासाठी 19 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तीन टप्प्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यासाठी 18 सप्टेंबरला, दुसऱ्या टप्प्यासाठी 25 सप्टेंबरला आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यासाठी 1 ऑक्टोबरला मतदान होणार आहे.
रविवारी (24 ऑगस्ट) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली तेव्हा भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय निवडणूक समितीचे इतर सदस्य सहभागी झाले होते. या बैठकीत जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली असून सोमवारी (26 ऑगस्ट) उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या 90 जागांवर निवडणूक होत असून, त्याचे निकाल 4 ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत. यापैकी 74 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी, तर 7 जागा अनुसूचित जाती आणि 9 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. जम्मू-काश्मीरमधील मतदारांची संख्या अंदाजे 87 लाख आहे, त्यापैकी 44.5 लाख पुरुष मतदार आहेत, तर 42.5 लाख महिला मतदार आहेत. 3.71 लाख मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.