ठाणेमुंबई
Trending

Bihar Election : बिहारमध्ये ‘डबल इंजिन’ सरकारवर शिक्कामोर्तब! उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आनंद

Ajit Pawar And Eknath Shinde On Bihar Election : एनडीएला २०० हून अधिक जागांवर आघाडी; शिंदे यांच्या प्रचारसभा घेतलेल्या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित

मुंबई :- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या Bihar Election निकालात भाजपप्रणित एनडीए आघाडीला ऐतिहासिक यश मिळाले आहे. सुरुवातीच्या कलांनुसार एनडीए २०० हून अधिक जागांवर निर्णायक आघाडीवर असून, राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार येणार हे स्पष्ट झाले आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल महाराष्ट्रातील महायुतीचे नेते आनंद व्यक्त करत आहेत.

अजित पवारांकडून अभिनंदन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एनडीएच्या या विजयावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “बिहारमध्ये एनडीएच्या सरकारने समाज कल्याणाच्या अनेक क्रांतिकारी योजना राबवल्या. तेथील लाडक्या बहिणींचेसुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात आशीर्वाद लाभले, त्याचंच हे यश आहे.”

ते पुढे म्हणाले, “बिहारमधील जनतेने डबल इंजिन सरकारला पुन्हा एकदा भरघोस कौल दिला आहे. हा विजय केवळ संख्याबळाचा नसून विकास, सुशासन आणि सामाजिक न्यायाच्या धोरणाचा विजय आहे. एनडीएच्या एकजुटीचा विजय आहे.” बिहारच्या सर्वांगीण विकासाला आणखी गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिंदेंच्या सभांचा फायदा

या निवडणुकीत शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही एनडीएच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या होत्या आणि त्यांच्या सभा यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे.

शिंदे यांनी पूर्व चंपारण्यमधील गोविंदगंज मतदारसंघात लोक जनशक्ती पार्टीचे उमेदवार राजू तिवारी यांच्यासाठी प्रचार सभा घेतली होती. राजू तिवारी सुमारे १६ हजार मतांनी पुढे असून त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे.

तसेच, कल्याणपूर मतदारसंघात भाजप उमेदवार सचिंद्रप्रसाद सिंग यांच्यासाठीही शिंदेंनी प्रचार सभा घेतली होती. सचिंद्रप्रसाद सिंग ५ हजार मतांनी आघाडीवर असून त्यांचाही विजय निश्चित मानला जात आहे.

बिहारमधील या मोठ्या यशाबद्दल महाराष्ट्रात महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0