Suraj Chavan Winner Bigg Boss Marathi Season 5 : गुलिगत धोका फेम सुरज चव्हाण ठरला ‘बिग बॉस मराठी 5’ चा महाविजेता
मुंबई :- अतिशय खडतर प्रवास करून इथवर आलेल्या सूरज चव्हाणने Suraj Chavan प्रेक्षकांच्या मनासोबतच ‘बिग बॉस मराठी 5’ची ट्रॉफी देखील जिंकली आहे. Winner Bigg Boss Marathi Season 5 ‘बिग बॉस मराठी 5’ला अखेर त्यांचा विजेता मिळाला आहे. ‘गोलिगत पॅटर्न’ घेऊन घरात आलेल्या सूरज चव्हाण याने विजेत पद पटकावत सगळ्यांनाच एक वेगळा सूरज दाखवला आहे. बिग बॉस मराठी सीजन 5’चा रविवारी फिनाले झाला. या संपूर्ण सीजनमध्ये ग्रामीण भागातील सूरज चव्हाण यांने आपली छाप पाडली. रिल स्टार असलेल्या सूरज चव्हाण हा यापूर्वीच गावा गावात सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहचला होता. परंतु बिग बॉस मराठीमुळे तो मराठी घरा घरापर्यंत पोहचला. 28 जुलै रोजी सुरु झालेला बिग बॉसमधील सूरज चव्हाण याचा यशस्वी प्रवास 70 दिवसांनी 6 ऑक्टोबर रोजी संपला.
बिग बॉस 5 चा विजेतपदासाठी सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांच्यामध्ये स्पर्धा होती. फिनाले दरम्यान, सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत टॉप 2 मध्ये राहिले. अभिजीत सावंत हा एक सुप्रसिद्ध गायक आणि इंडियन आयडॉलचा पहिला विजेता होते. त्याला सूरजने मागे टाकून विजेतेपद मिळवले. अभिजित उपविजेता ठरला. अभिजीतने संपूर्ण सीझनमध्ये आपला करिष्मा दाखवला.
सूरज चव्हाण सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध आहे. सूरज हा बारामतीमधला आहे. सूरजचे आयुष्य हे अत्यंत खडतर गेले आहे. लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. त्यात घराची परिस्थिती देखील बिकट असल्याने त्याने केवळ आठवीपर्यंतचे शिक्षण घेतले. सूरजला पाच बहिणी असून त्याच्या मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केला आहे. बुक्कीत टेंगूळ, गुलीगत धोका अशा त्याच्या शब्दांमुळे आणि रिल्समुळे सूरज चांगलाच फेमस देखील झाला.
सूरज चव्हाण याला बिग बॉस मराठीतील विजेयामुळे 14 लाख 60 हजार रुपये मिळाले. तसेच पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सकडून दहा लाख रुपये मिळाले. त्यासोबतच सूरज चव्हाण याला एक स्कूटर मिळाली. एका चित्रपटाची ऑफरसुद्धा सुरजला मिळाली. प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्याला चित्रपटाची ऑफर दिली. सूरज आगामी काळात आपल्याला झापुकझुपुक या चित्रपटात दिसणार आहे. बिग बॉसच्या सिजनमध्ये गेस्ट म्हणून आलेले असतांना उत्कर्ष शिंदे यांनीही सुरजला एक गिफ्ट दिले होते. त्यावेळी उत्कर्ष शिंदे म्हणाले की, सूरजसोबत शिंदेशाही म्हणजेच शिंदे कुटुंबीय एक गाणे बनवणार आहेत.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…