मुंबई

मुंबईकरांना मोठा दिलासा! 15 डब्यांच्या लोकलची संख्या वाढवण्याचे रेल्वे बोर्डाचे निर्देश

Mumbai Local Latest News : सीएसएमटी येथील प्रकल्पांच्या आढावा बैठकीत निर्णय; प्रवाशांच्या सुरक्षिततेवर भर

मुंबई :- मुंबईकरांच्या प्रवासातील गर्दी कमी करण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सतीश कुमार यांनी सोमवारी (4 ऑगस्ट) मुंबईत 15 डब्यांच्या लोकल गाड्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश दिले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे झालेल्या रेल्वे प्रकल्पांच्या आढावा बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. Mumbai Local Latest News

या बैठकीत मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमधील उपनगरीय रेल्वे सेवा अधिक चांगल्या करण्याच्या कामांचा आढावा घेण्यात आला. कुमार यांनी यावेळी प्रवाशांची सुरक्षा, सुविधा आणि लोकल सेवांची क्षमता वाढवणाऱ्या प्रकल्पांना वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मध्य रेल्वे (CR), पश्चिम रेल्वे (WR), मुंबई रेल्वे विकास निगम (MRVC) आणि इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीत उपस्थित होते. पीटीआयच्या माहितीनुसार, प्रवाशांना गर्दीतून दिलासा मिळावा यासाठी 15 डब्यांच्या लोकलची संख्या वाढवण्याच्या योजनेवर चर्चा झाली.

बैठकीनंतर सतीश कुमार यांनी सीएसएमटीच्या पुनर्विकास कामांची पाहणी केली. तसेच, पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी यार्डला भेट देऊन तेथील नवीन कोचिंग टर्मिनलच्या कामाचा आढावा घेतला. एमआरवीसी अधिकाऱ्यांकडून 17 उपनगरीय स्थानकांच्या सुधारणा कार्यक्रमाबद्दल माहिती घेऊन त्यांनी काम करताना प्रवाशांची सुरक्षा आणि कामाच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे सांगितले.

vivek

Recent Posts