मुंबई

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून मोठा वाद; ‘दिबा पाटलांच्या नावाला अदानींचा विरोध’ – संजय राऊत

Sanjay Raut On Navi Mumbai Airport : संजय राऊत यांचा मोठा दावा: ‘भाजपमध्ये ‘नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ’ नामकरणाची चर्चा’

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांनी बुधवारी (8 ऑक्टोबर) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले, मात्र या विमानतळाला कोणतेही नाव न दिल्याने आता मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी भाजप आणि गौतम अदानी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

‘दिबा पाटलांच्या नावाच्या आडकाठीत अदानी’

राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “पंतप्रधान मोदींनी बुधवारी उघड्या बोडक्या विमानतळाचे लोकार्पण केले. दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यास भाजपचा विरोध आहे.” इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याची गरज नाही, असा विचार भाजपमध्ये असल्याचे ते म्हणाले.

सर्वात मोठा आणि गंभीर आरोप करताना राऊत म्हणाले, “गौतम अदानी यांचाही दिबा पाटील यांच्या नावाला विरोध आहे.”

‘विमानतळाला मोदींचे नाव देण्याचा विचार’

संजय राऊत यांनी भाजपअंतर्गत सुरू असलेल्या चर्चेचा दावा केला आहे. ते म्हणाले, “‘नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव नवी मुंबईच्या विमानतळाला देण्यात यावे, अशी मागणी, प्रस्ताव आणि चर्चा भाजपअंतर्गत सुरू आहे.”

या दाव्याला समर्थन देताना त्यांनी अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमचे उदाहरण दिले. “जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे नाव सरदार वल्लभभाई पटेल होते, त्याचे नामांतर जिवंतपणीच नरेंद्र मोदी यांच्या नावाने करण्यात आले. त्याचप्रमाणे नवी मुंबईच्या विमानतळालाही नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात यावे, यासाठी भाजप पक्षात एकमत झालेले आहे,” असे राऊत म्हणाले.

‘अदानींचा होकार आणि शिवसेनेची मागणी’

संजय राऊत यांनी दावा केला की, “या नामकरणास गौतम अदानी यांचाही होकार असल्यामुळे नवी मुंबईच्या विमानतळास दिबा पाटील यांचे नाव मिळू शकले नाही.” नवी मुंबईमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानींच्या नावाने ओळखला जावा किंवा त्याला नरेंद्र मोदी यांचे नाव मिळावे, अशी मागणी उद्योगपती गौतम अदानींची आहे, असाही दावा त्यांनी केला.

दिबा पाटील यांच्या नावाने सदर विमानतळाचा प्रकल्प मंजूर झालेला होता. त्यामुळे विमानतळाला त्यांचेच नाव दिले जावे, अशी शिवसेनेची (ठाकरे) मागणी पुढेही असणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

खासदार संजय राऊत यांची मोदींवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे तेरावे अवतार असून, त्यांचे नाव विमानतळाला देण्याची काही गरज नाही, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली. अहमदाबादच्या स्टेडियमला नाव देण्यास मोदींनी सुरुवातीला विरोध दर्शविला होता, तरीही स्वतःच्या नावाच्या स्टेडियमचे उद्घाटन त्यांनी केले होते, त्यामुळे नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत त्यांनी केलेल्या विधानांवर विश्वास ठेवता येणार नाही, असे राऊत म्हणाले.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

3 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago