Big Boss Marathi-5 Winner मराठी लोकप्रिय रियालिटी शो बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता सूरज चव्हाण यांच्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून शुभेच्छा
•Suraj Chavan Big Boss Marathi-5 Winner रील स्टार सूजन चव्हाण यांने मराठी बिग बॉसच्या सीजन 5 चा विजेता झाल्यानंतर बारामती लोकसभेचे खासदार सुप्रिया सुळे आणि विधानसभेचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा
मुंबई :- अतिशय हालकीच्या परिस्थितीतून मराठी रंगमंचावरील अतिशय लोकप्रिय ठरलेल्या मराठी बिग बॉस रियालिटी शो मधील पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण झाला आहे. सूरज हा बारामती तालुक्यातून असून त्याच्या हटक्या स्टाईल मुळे तो फार प्रसिद्ध आहे. त्याच्या हाटक्या स्टाईलमुळे यंदाच्या बिग बॉस मराठीच्या सीजनमध्ये त्याची निवड करण्यात आली होती. त्यांनी अतिशय प्रामाणिक कोणालाही अपशब्द न बोलता या शोमध्ये आपली खेळी केली आणि त्यानंतर तो विजय ठरला त्याच्या विजयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामती लोकसभाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी शुभेच्छा दिल्या आहे.
सूजन चव्हाण याने अनेक दिग्गज लोकप्रिय असलेले प्रतिस्पर्धी यांना टक्कर देत बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. त्याच्या एस्क्युजेड क्यू… गुलिगत पॅटर्न… बुक्की टेंगूळ…. झापूक झुपूक… स्टाईलने बिग बॉस मध्ये आणि महाराष्ट्राच्या जनतेला भुरळ घातली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज याच्यासाठी एक सिनेमाही तयार करणार असल्याचे सांगितले आहे. तर लोकप्रिय गायक उत्कर्ष शिंदे याने त्याच्यावर एक गाणेही काढले आहे आणि त्याची लोकप्रियता सध्या फार चर्चेत बनले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा
आमच्या बारामतीचा सुपुत्र सुरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता ठरला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत सुरजनं हे यशोशिखर गाठलं आहे. सुरज आपल्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. त्याच्या यशामुळे बारामतीचाच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढला आहे. सुरजला उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
कलर्स मराठी या वाहीनीवर सुरु असलेल्या ‘बिग बॉस’ या रियॅलिटी शो मध्ये आपल्या बारामतीचा रीलस्टार सूरज चव्हाण हा विजेता ठरला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन सूरजने हे यश मिळविले. बिग बॉसच्या घरात सूरजने जनतेच्या हृदयात जागा निर्माण केली. त्याचे या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन तथा पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. सूरज आम्हाला तुझा अभिमान वाटतो.