मोठी कारवाई! मोक्कातील 10 महिन्यांपासून फरार आरोपीला कोंढवा पोलिसांकडून बेड्या

Pune Latest Crime News : गोपनीय माहितीच्या आधारे कोंढवा तपास पथकाने सापळा रचून आरोपी हर्ष जाधव याला केले जेरबंद
पुणे :- पुणे शहर पोलिसांच्या Pune Police कोंढवा तपास पथकाने गेल्या दहा महिन्यांपासून मोका कायद्यांतर्गत फरार असलेल्या एका कुख्यात आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली आहे. आरोपी हर्ष संतोष जाधव याला कोंढवा पोलिसांनी Kondhwa Police श्रीराम चौक परिसरातून ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे पुणे पोलिसांच्या कामगिरीचे पुन्हा एकदा कौतुक होत आहे. Pune Latest Crime News
कोंढवा तपास पथकातील पोलीस अंमलदार विकास मरगळे आणि पुष्पेंद्र चव्हाण यांना सोमवारी, 4 ऑगस्ट रोजी त्यांच्या गोपनीय बातमीदारांकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली. कोंढवा पोलीस ठाण्यामधील मोक्का कायद्याअंतर्गत पाहिजे असलेला आरोपी हर्ष जाधव हा श्रीराम चौक, कात्रज-कोंढवा रोड येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती त्यांना मिळाली.
या माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव यांना कळवले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या आदेशानुसार, राकेश जाधव यांनी एक विशेष पथक तयार केले. यामध्ये पोलीस अंमलदार विकास मरगळे, पुष्पेंद्र चव्हाण, सुहास मोरे आणि लक्ष्मण होळकर यांचा समावेश होता. या पथकाने श्रीराम चौकात सापळा रचला.
आरोपी हर्ष जाधव (वय 19) हा त्या ठिकाणी येताच, पोलिसांनी त्याला कोणत्याही प्रतिकार करण्याची संधी न देता ताब्यात घेतले. त्याला दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.



