ACB Action Mode On : एसीबीची मोठी कारवाई, सेवा सहकारी संस्था, बीड यांच्या दोन सचिवांना लाच घेताना अटक
•Provocative Bribery Scandal Uncovered in Beed’s Cooperative Societies एसीबीने मोठी कारवाई केली आहे. एसीबीने दोन सचिवांना 1 लाख 25 हजार रुपयांची लाच घेताना अटक केली आहे.
बीड :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव यांनी कारवाई करत बीड जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्था म.मौ.वानटाकळी तालुका परळी यांच्या दोन सचिवांना लाच स्वीकारताना अटक केली आहे. The Mysterious Action Taken by ACB Against Two Secretaries in Beed लेखापरीक्षणाचे अहवाल सादर करण्याकरिता एकूण रकमेच्या निम्मी रक्कम लाच म्हणून मागितली होती. बाळासाहेब धोंडीराम शिगे (56 वर्ष, सचिव, सेवा सहकारी संस्था, म.मौ.वानटाकळी,ता. परळी), अंकुश पवार (सचिव, सेवा सहकारी संस्था, म.मौ.वानटाकळी,ता. परळी) यांना 1.25 लाखांची लाच स्वीकारताना अटक केली आहे.
तक्रारदार यांनी सेवा सहकारी संस्था म.वानटाकळी तालुका परळी वै.,जि. बीड या संस्थेचे सन 2008 ते सन 2021 पर्यंतचे लेखापरीक्षण करून अहवाल सादर केला होता. तक्रारदार यांनी केलेल्या लेखापरीक्षणचे नियमानुसार शुल्क रक्कम 2 लाख 51 हजार 571 रुपये चा चेक तक्रारदार यांना देण्यासाठी शिगे सचिव याने पंचासमक्ष देय रक्कमेच्या निम्मी रक्कम मागणी करून तडजोडीअंती 1 लाख 25 हजार रुपये लाचेची मागणी करुन लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. Beed District Shaken by ACB’s Fear-Inducing Crackdown on Cooperative Society तसेच अंकुश पवार, सचिव याने लाच रक्कम देण्यास प्रोत्साहन दिले. एसीबीने सापळा रचून लाच रक्कम शिगे यांनी पंचासमक्ष स्वीकारली असता ताब्यात घेण्यात आले असून पोलीस ठाणे परळी वै. शहर जि. बीड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एसीबी पथक
संदीप आटोळे पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, छत्रपती संभाजीनगर.मुकुंद आघाव अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र. वि, छत्रपती संभाजीनगर,पर्यवेक्षण अधिकारी-सिद्धाराम म्हेत्रे , पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव युनिट, यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी नानासाहेब कदम पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि.धाराशिव सापळा पथक : पोलीस अंमलदार – आशिष पाटील सिद्धेश्वर तावस्कर , सचिन शेवाळे, दत्तात्रेय करडे यांनी कारवाई करत दोन सचिवांना अटक केली आहे. Direct Order from ACB: Beed Secretaries Arrested for Receiving 1.25 Lakh Bribe.