मुंबई
Trending

Bhushan Gavai : “अधिकारी घाबरतात म्हणे!” – सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मिश्कील टोलेबाजीत सभागृहात हशा

Bhushan Gavai : विधीमंडळात सत्कार सोहळ्यादरम्यान सरन्यायाधीशांचा संविधान व न्यायव्यवस्थेवर अभ्यासपूर्ण, तर कधी मिश्कील सूर

मुंबई | भारताचे 52 वे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांच्या सन्मानार्थ आज महाराष्ट्र विधीमंडळात आयोजण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात एकीकडे संविधान, लोकशाही आणि न्यायव्यवस्थेवर चिंतन सुरू असतानाच अचानक एक हसण्याचा गदारोळ उसळला — आणि यामागचं कारण ठरलं सरन्यायाधीशांचं अजित पवारांकडे बघून मारलेलं मिश्कील टोला!

गंभीर विषयांवर भाष्य करत असतानाच गवई म्हणाले,

“अजित पवार म्हणाले, मला अधिकारी घाबरतात! पण मी अशा प्रकारचे आदेश देत नव्हतो…”
हे ऐकताच सभागृहात एकच हशा पिकला. अजित पवार यांनी डोक्यावर हात मारून हसत प्रतिक्रिया दिली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिलखुलास हसताना दिसले.

संविधान हे माझं दिशादर्शक, तारेवरची कसरत करत राहणार”
यावेळी बोलताना सरन्यायाधीश गवई यांनी स्पष्ट केलं,

“मला जेव्हा संधी मिळते, तेव्हा मी संविधानातील मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्त्वांमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो. ही एक तारेवरची कसरत असते.”

त्यांनी नागपूरमधील एका खटल्याचा संदर्भ देत सांगितलं की, एका न्यायालयीन आदेशामुळे झोपडपट्ट्या पाडण्याचे संकट ओढवले होते. परंतु आपण न्यायव्यवस्थेचा मान राखून मानवी हक्कही जपले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0