Bhushan Gagrani : मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती
•मुंबई महानगरपालिका माजी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाकडून पदभार सोडण्याचे सांगितले होते
मुंबई :- राज्यात लोकसभेच्या सर्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानुसार तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळापासून एकाच पदावर असणाऱ्या अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या निवडणूक आयोगाने केल्या आहेत. यात मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी Bhushan Gagrani यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्त पदी सौरभ राव तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदी कैलास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीचे रनधुमाळी चालू असताना मुंबईतील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या करण्यात आलेल्या बदल्यामुळे सर्वांचेच लक्ष याकडे वेधले गेले. Bhushan Gagrani
ज्या अधिकाऱ्यांना नियुक्तीच्या ठिकाणी तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ झाला आहे, त्या सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला आधीच केल्या होत्या. मात्र असे असताना देखील महाराष्ट्र सरकारने अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या नाहीत. महाराष्ट्रा प्रमाणेच अशी स्थिती देशभरातली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त एकबालसिंग चहल यांची देखील बदली करण्यात आली होती, मात्र त्यांना पदावर हटवल्यानंतर त्या जागेवर कोणता अधिकारी येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानुसार आता भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. Bhushan Gagrani
भूषण गगराणी यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. भूषण गगराणी हे 1990 सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्याकडे मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव पदाचा कार्यभार होता. मात्र, आता ते मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असतील. Bhushan Gagrani