•Bhiwandi Tadipar News तडीपार आरोपीला एक वर्षाच्या कालावधी करिता ठाणे जिल्ह्यातून हद्दपार
भिवंडी :- तडीपारीची कारवाई केल्यानंतरही शहरात वास्तव्य करणाऱ्या गुंडाला भिवंडी शहर पोलिसांनी जेरबंद केलं आहे. अब्दुल खालिद मोमीन (22 वर्ष, रा. नवी वस्ती भिवंडी ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
अब्दुल खालिद मोमीन याच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला ठाणे जिल्हा हद्दीतून पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-2, भिवंडी यांनी तडीपार करण्याचे आदेश दिले होते. तडीपार केल्यानंतर पोलीस उपआयुक्त,परिमंडळ -2 यांच्या परवानगीशिवाय प्रवेश करण्यास मनाई असताना शहरामध्ये वावर करत होता. त्याला 30 एप्रिल 2024 रोजी एक वर्षाच्या कालावधी करिता हद्दपार करण्यात आले होते. पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुंबरे आणि पोलीस उप आयुक्त परिमंडळ -2, भिवंडी यांची कोणतीही परवानगी न घेता भिवंडी शहरांमध्ये तो राहत असलेल्या नवी वस्ती येथे आला होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून आरोपी अब्दुल याला नववस्ती भिवंडी येथून अटक केली आहे. सरकारतर्फे पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 132 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भोईर हे करत आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…