मुंबई

Bhiwandi Tadipar News : भिवंडी शहर पोलिसांची कारवाई ; मनाई आदेशाचा भंग करणारा तडीपार गुंडाला अटक

Bhiwandi Tadipar News तडीपार आरोपीला एक वर्षाच्या कालावधी करिता ठाणे जिल्ह्यातून हद्दपार

भिवंडी‌ :- तडीपारीची कारवाई केल्यानंतरही शहरात वास्तव्य करणाऱ्या गुंडाला भिवंडी शहर पोलिसांनी जेरबंद केलं आहे. अब्दुल खालिद मोमीन (22 वर्ष, रा. नवी वस्ती भिवंडी ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

अब्दुल खालिद मोमीन याच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला ठाणे जिल्हा हद्दीतून पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-2, भिवंडी यांनी तडीपार करण्याचे आदेश दिले होते. तडीपार केल्यानंतर पोलीस उपआयुक्त,परिमंडळ -2 यांच्या परवानगीशिवाय प्रवेश करण्यास मनाई असताना शहरामध्ये वावर करत होता. त्याला 30 एप्रिल 2024 रोजी एक वर्षाच्या कालावधी करिता हद्दपार करण्यात आले होते. पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुंबरे आणि पोलीस उप आयुक्त परिमंडळ -2, भिवंडी यांची कोणतीही परवानगी न घेता भिवंडी शहरांमध्ये तो राहत असलेल्या नवी वस्ती येथे आला होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून आरोपी अब्दुल याला नववस्ती भिवंडी येथून अटक केली आहे. सरकारतर्फे पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 132 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भोईर हे करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0