Uncategorized

Bhiwandi Tadipar News : मनाई आदेश भंग, तडीपार आरोपीला अटक

  • भोईवाडा पोलिसांची कारवाई, आरोपीला एक वर्षाकरिता पाच जिल्ह्यात प्रवेश बंदी होती

भिवंडी :- आगामी लोकसभा निवडणुका राज्याच्या राजकारणातील आणि शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याकरिता पोलिसांकडून विविध उपाय योजना केल्या जात आहे. ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे Ashutosh Dumbare यांनी शहरातील तडीपार आरोपींची यादी समोर घेऊन जे तडीपार आरोपी आहेत ते विनापरवाना शहरांमध्ये प्रवेश करत असाल तर त्यांना त्वरित अटक करण्याच्या सूचना दिल्या आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यास मनाई आदेश भंग करणाऱ्या आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. भिवंडीच्या भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक वर्षाकरिता तडीपार केलेला आरोपींना पोलिसांनी अटक केले आहे. Bhiwandi Tadipar News

आरोपी मोहम्मद हानिफ ऊर्फ जुगनू शौकतअली अन्सारी (39 वर्ष) याला पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 भिवंडी यांनी , मुंबई शहर,मुंबई उपनगर, नवी मुंबई,पालघर आणि रायगड या पाच जिल्ह्यातून 11 मार्च 2023 रोजी एक वर्षाकरिता हद्दपार करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते. परंतु आरोपी 07 मार्च कोणाचीही परवानगी न घेता धोबी तलाव भिवंडी येथे आले असल्याची माहिती भोईवाडा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून आरोपी याला अटक केली आहे. भोईवाडा पोलीस ठाण्यात पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मोहम्मद हानिफ ऊर्फ जुगनू शौकतअली अन्सारी याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक सावंत हे करत आहे. Bhiwandi Tadipar News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0