Bhiwandi Robbery News : भिवंडीत ज्वेलर्समध्ये चोरी
Bhiwandi Robbery News : भिवंडीतील सागर ज्वेलर्स मध्ये चोरीची घटना, लाखोंचे दागिने लंपास
भिवंडी :- भिवंडी शहरातील तेलीपाडा परिसरात असलेल्या सागर ज्वेलर्स Bhiwandi Sagar Jewelry Shop वर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. Bhiwandi Robbery News चोरीमध्ये चोरट्यांनी लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहे. याबाबतची फिर्याद सागर ज्वेलर्स चे मालक नरेश कुमार नानालालजी जैन यांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात Bhiwandi Police Station दाखल केली आहे. Bhiwandi Crime News
पहाटेच्या दरम्यान भिवंडी मध्ये ज्वेलर्स मध्ये डाका
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून 30 जुलै च्या पहाटे ही घटना घडल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ज्वेलर्सची पाहणी केली असता असे दिसून आले की, अज्ञात चोरट्याने लोखंडी शटर चे कुलूप तोडून आत मध्ये प्रवेश करून लाखोचे दागिने लंपास केले आहे. तसेच फिर्यादी ज्वेलर्स चे मालक नरेश कुमार जैन यांच्या म्हणण्यानुसार दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने ज्याची किंमत 09 लाख 64 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. फिर्यादी यांनी दिलेला तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 305, 331 (2) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक डगळे हे करत आहे. पोलिसांनी दुकानामधील सीसीटीव्ही कॅमेरेची पाहणी करून अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहे. Bhiwandi Crime News