Narpoli Police Caught 3 Gavathi Pistol With 2 Magazine During Police Patrolling : 3 गावठी पिस्टल,2 मॅक्झिन,3 जिवंत काडतुसे विक्रीसाठी आलेल्या 22 वर्षीय राजस्थानातील तरुणाला अटक, गावठी कट्टा आणि काडतुसे नारपोली पोलिसांनी जप्त केलं
भिवंडी :- नारपोली पोलीस ठाण्याचे Narpoli Police सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे आणि अंमलदार पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना माहिती मिळाली होती की, एक व्यक्ती जो धामणकर नाका ते अंजुर फाटा यांना जोडणाऱ्या बांधकाम चालू असलेल्या मेट्रो स्टेशन खाली गावठी पिस्तूल व जिवंत काडतूसे विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. Bhiwandi Police Latest News
पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने नारपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे व अंमलदार यांनी बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक कामात त्यांच्या सूचनेप्रमाणे धामणकर नाकाच्या अंजुर फाटा येथे जोडणाऱ्या मेट्रो स्टेशनच्या खाली सार्वजनिक रोडवर विजय भजीया सेंटर समोर सापळा रचून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ तीन गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन मॅक्झिन, तीन जिवंत काडतुसे असा एकूण एक लाख 73 हजार किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलिसांनी सहवाग घनश्याम चतरावत (22 वय,रा. राजस्थान) याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात नारपोली पोलीस ठाणे येथे भारतीय शस्त्र अधिनियमन 3,25(ब-1),अ सह मुंबई पोलीस कायदा कलम 37 (1),(3),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Bhiwandi Police Latest News
पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-2, भिवंडी, डॉ. मोहन दहिकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, पुर्व विभाग भिवंडी, सांगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कामत यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे, पोलीस हवालदार सस्कर, व त्यांच्या पथकाने केली आहे. Bhiwandi Police Latest News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…