Bhiwandi Police News : भिवंडीत 43.63 लाखांचा गुटखा जप्त; ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
Bhiwandi Narpoli Police Seized 43 Lakh Worth Tobacco : नारपोली पोलीस ठाण्याने जप्त केलेल्या विविध कंपन्यांच्या या गुटख्याची किंमत 43 लाख 63 हजार 379 रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई केल्याने गुटखा विक्रीच्या गोरखधंदा करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत.
भिवंडी :- भिवंडी तालुक्यातील वळगांव ग्रामपंचायत हद्दीतील एका गोदामात गुटख्याचे घबाड ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाला सापडले आहे. या गोदामात साठवणूक करून ठेवलेला तब्बल 43 लाख 63 हजार 379 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. Bhiwandi 43 lakh rs Worth Gutkha seized विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. Bhiwandi Latest Crime News
महाराष्ट्रात गुटखा बंदी नंतरही राज्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री सर्रासपणे सुरू आहे.भिवंडी वळगांव ग्रामपंचायत हद्दीतील मॉ पद्मावती कॉम्प्लेक्समधील एका गोदामात मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा असल्याची माहिती ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या खबऱ्यामार्फत मिळाली होती. जप्त केलेल्या विविध कंपन्यांच्या या गुटख्याची किंमत 43 लाख 63 हजार 379 रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अंमली पदार्थ विभागानेही मोठी कारवाई केल्याने गुटखा विक्रीच्या गोरखधंदा करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी राजेश मिश्रा (रा. मुलुंड मुबई) व त्याचे साथीदार यांचे विरूध्द नारपोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 123,223,274,275 सह अन्न सुरक्षा आणि मानके अधि. 2006 चे कलम 26 (2),27(2),59 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे. Bhiwandi Latest Crime News
पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, (प्रतिबंध) धनाजी क्षिरसागर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राहुल मस्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक, जगदीश गावीत, पोलीस उप निरीक्षक दिपेश किणी, राजेंद्र निकम, मोहन परब, पोलीस हवालदार प्रशांत राणे, शिवाजी वासरवाड, विक्रांत पालांडे,हरीश तावडे,अभिजीत मोरे, हेमंत महाले,महेश साबळे, हुसेन तडवी, पोलीस नाईक अनुप राक्षे, महिला पोलीस हवालदार शिल्पा कसबे, महिला पोलीस शिपाई कोमल लादे यांचे पथकाने केलेली आहे. गुन्हयाचा अधीक तपास अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दिपेश किणी हे करीत आहेत. Bhiwandi Latest Crime News