Bhiwandi Police News : भिवंडीत खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई ; गांजा विक्रीसाठी आलेल्या आरोपीस अटक
Bhiwandi Police Seized Ganja Worth 40 KG 😕भिवंडीत गांजा विक्रीसाठी आलेल्या आरोपीस अटक करण्यात आली. आरोपीकडून तब्बल 20 किलो 40 ग्रॅम गांजा जप्त
भिवंडी :- भिवंडीत पोलिसांकडून Bhiwandi Police मोठी कारवाई करण्यात आली आहे.प्रतिबंधित गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या गांजा तस्कराला Bhiwandi Ganja Sumggling खंडणी विरोधी पथक आणि शांतीनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. रहीम करीम शेख (34 वय) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.भिवंडीत अवैद्य गुटखा व गांजा विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमरसिंग जाधव यांनी अवैद्य धंदे करणाऱ्या आरोपींच्या मुस्क्या आवळण्याचे निर्देश शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकास मिळालेल्या माहितीवरून पोलिसांचे एक पथक एकता चौक, क्रांतीनगर, निजामपुरा, भिवंडी येथे सापळा रचून रहीम करीम शेख याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी रहिम याची अंगझडती त्याच्याजवळ असलेल्या पिशवीमध्ये तब्बल वीस किलो 400 ग्रॅम वजनाचा दोन लाख रुपयांचा गांजा अंमली पदार्थ मिळून आला आहे. आरोपीच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीवर यापूर्वीही अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पोलीस पथक
अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), ठाणे, राजकुमार डोंगरे, सहायक पोलीस आयुक्त, शोध-2, गुन्हे शाखा, ठाणे, शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध-1, तथा प्रभारी अधिकारी, खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेश पवार व त्यांच्या पथकाने केलेली आहे.