Bhiwandi Crime Branch Latest News : गुन्हे शाखेची मोठी कारवाई; लाखोंचा मुद्देमाल हस्तगत, आरोपींना पोलीस कोठडी
भिवंडी :- भिवंडी शहरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तस्करांना गुन्हे शाखेने Bhiwandi Crime Branch मोठा दणका दिला आहे. गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी सापळा रचून अटक केली असून, त्यांच्याकडून 4 किलो 827 ग्रॅम गांजा आणि गावठी कट्टा असा एकूण 3 लाख 85 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. Bhiwandi Police Latest News
पोलीस उपनिरीक्षक सुनील साळुंखे यांना 17 सप्टेंबर रोजी दोन इसम गांजा विक्रीसाठी भिवंडीतील के. बी. चौकी-ताडाळी रोडदरम्यान येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यांनी ही माहिती तात्काळ गुन्हे शाखा, घटक-2, भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कायदेशीर परवानगी घेऊन, पंचांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी सापळा रचला.
पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात प्रशांत उर्फ सलाड सुरेश तायडे (वय 27) आणि सोहेल उर्फ पित्तल इरफानअली अन्सारी (वय 20) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून 4 किलो 827 ग्रॅम गांजा आणि यामाहा कंपनीची स्कूटर जप्त करण्यात आली, ज्याची एकूण किंमत 3 लाख 54 हजार 800 रुपये आहे.
घरातून गावठी कट्टा जप्त
पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली. गांजा कोठून आणला, याचा शोध घेत असतानाच, आरोपी प्रशांत तायडे याच्या घराची झडती घेण्यात आली. त्यावेळी पोलिसांना एक अवैध माऊझर/पिस्टल आणि एक जिवंत काडतूस सापडले. यामुळे या गुन्ह्यात आणखी भर पडली आहे.
आरोपींविरुद्ध भिवंडी शहर पोलीस ठाण्यात Bhiwandi Police Station NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना पुढील तपासकामी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्हे शाखा घटक-2, भिवंडी या गुन्ह्याचा पुढील तपास करत असून, गांजा पुरवणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहे.
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…