Mumbai Crime News : माटुंगा पोलिसांची कामगिरी : १२ लाखांची महिंद्रा थार चोरी करणारा आरोपी अटक

मुंबई : माटुंगा पोलिसांनी चोरीला गेलेली महिंद्रा कंपनीची थार (क्र. UP78-GV-2977) किंमत ₹१२ लाख हस्तगत करून एक आरोपीस अटक करण्यात यश मिळवले आहे.
दिनांक १५ जुलै ते २५ जुलै २०२५ या कालावधीत फिर्यादीची कार राहत्या घरासमोरून चोरीस गेल्याने माटुंगा पोलीस ठाण्यात गु.र.क्र. १८२/२०२५, कलम ३०३(३) भा.न्या.स. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपास, गुप्त माहिती व सततच्या पाठपुराव्याच्या आधारे मानखुर्द परिसरातून आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेली थार जप्त करण्यात आली.
अटक आरोपी :
दत्तात्रय सर्जेराव पवार (वय २४ वर्षे), रा. बाहेरील आळी, गाव खटाव, ता. खटाव, जि. सातारा.
हस्तगत मालमत्ता :
काळ्या रंगाची महिंद्रा थार (क्र. UP78-GV-2977), किंमत ₹१२,००,०००/-
ही यशस्वी कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण, अपर पोलीस आयुक्त मध्य विभाग विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त परिमंडळ-०४ रागसुधा आर., सहाय्यक पोलीस आयुक्त माटुंगा विभाग सचिन कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार व पोनि (गुन्हे) प्रतिभा जोगळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.


