मुंबई

Bhiwandi News : भिवंडी महापौर निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप! भाजपमध्ये फूट; 9 नगरसेवक काँग्रेसच्या गोटात, नव्या समीकरणांनी रंगत वाढली

नारायण चौधरींचे बंड, काँग्रेसचा व्हिप आणि भाजपची कारवाईची टांगती तलवार; 20 फेब्रुवारीच्या निवडीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

भिवंडी | भिवंडी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीपूर्वी शहराच्या राजकारणात अभूतपूर्व घडामोडी घडत आहेत. महायुतीमध्ये फूट पडल्यानंतर आता भाजपमध्येही उभी फूट पडली असून, पक्षाचे अधिकृत उमेदवार बदलल्याने नाराज झालेले नारायण चौधरी यांनी आपल्या समर्थकांसह चक्क काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ‘भिवंडी सेक्युलर फ्रंट’शी हातमिळवणी केली आहे. यामुळे उद्या, 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत मोठा उलटफेर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजपमधील अंतर्गत वाद आणि ‘ट्विस्ट’

भाजपकडून सुरुवातीला नारायण चौधरी आणि सुमित पाटील यांची नावे चर्चेत होती. पक्षाने नारायण चौधरी यांची उमेदवारी जाहीर केली होती, मात्र ऐनवेळी भिवंडी शहराध्यक्ष रवी सावंत यांनी पत्राद्वारे चौधरींची उमेदवारी रद्द करून स्नेहा पाटील यांच्या नावाची घोषणा केली. या निर्णयामुळे संतापलेल्या नारायण चौधरी यांनी भाजपला जय महाराष्ट्र करत आपल्या 9 समर्थक नगरसेवकांसह विरोधी गटाशी संधान साधले. हे नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीलाही गेले होते, मात्र आता त्यांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

नवे सत्ता समीकरण आणि काँग्रेसचा ‘व्हिप’

भिवंडी महापालिकेत एकूण संख्याबळ पाहता काँग्रेस (30), भाजप (22), राष्ट्रवादी (12) आणि शिवसेना (12) अशी स्थिती आहे. आता निर्माण झालेल्या नव्या समीकरणानुसार:

महापौर पद: नारायण चौधरी (भाजपचे बंडखोर)

उपमहापौर पद: तारीक मोमीन (काँग्रेस)

काँग्रेसने आज अधिकृत ‘व्हिप’ जारी करून आपल्या नगरसेवकांना नारायण चौधरी आणि तारीक मोमीन यांच्या बाजूने मतदान करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपचे 9 नगरसेवक आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ मिळाल्यास हे गट बहुमताचा आकडा सहज पार करू शकतात.

पक्षांतर बंदी कायद्याची टांगती तलवार

भाजपच्या अधिकृत उमेदवाराऐवजी (स्नेहा पाटील) बंडखोर उमेदवाराला मतदान केल्यास भाजप या नगरसेवकांवर कठोर कारवाई करण्याची चिन्हे आहेत. पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन केल्यास संबंधित नगरसेवकांचे पद धोक्यात येऊ शकते आणि विभागीय आयुक्तांमार्फत त्यांना अपात्र ठरवले जाऊ शकते. तरीही, भाजपचे हे नगरसेवक आज मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेणार असून, त्यांनी काँग्रेसच्या गटामध्ये नोंदणीही केल्याची माहिती समोर येत आहे.

भिवंडीतील सध्याचे संख्याबळ

काँग्रेस 30
भाजप 22
राष्ट्रवादी / शिवसेना प्रत्येकी 12
समाजवादी पक्ष 06
कोणार्क विकास आघाडी 04
इतर / अपक्ष 04

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

39 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago