मुंबई

Bhiwandi Crime News : भिवंडी महानगरपालिकेचा लिपिक ‘ACB’ च्या जाळ्यात

•Bhiwandi Municipal Corporation Clerk in ‘ACB’ network तक्रारदार यांच्या आईच्या नावावर असलेली घरपट्टी स्वतःच्या नावावर करण्याकरिता मागितली होती 20 हजारांची लाच

भिवंडी :- भिवंडी निजामपुरा शहर महानगरपालिकेच्या लिपिकाला 10 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले आहे. 19 सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली असून, शांतीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अजय सिताराम गायकवाड, (42 वर्ष, लिपीक, नेमणूक भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका, भिवंडी) असे आरोपीचे नावे आहे.

यातील तक्रारदार याचे आईच्या नावावर असलेली घरपट्टी तक्रारदार यांचे नावावर करण्यासाठी त्यांनी प्रभाग समिती येथे अर्ज केला होता. घरपट्टी नावावर करून देण्यासाठी लिपिक अजय गायकवाड यांनी तक्रारदार त्यांच्याकडे वीस हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. या संदर्भात तक्रारदार यांनी ठाणे एसीबी कार्यालयाला लिपिक अजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दिली होती.

एसीबीने तक्रारीच्या अनुषंगाने 19 सप्टेंबर रोजी केलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान वरील नमुद आरोपी यांनी तक्रारदार यांचेकडे वीस हजार रुपये दयावे लागतील असे सांगुन प्रथम दहा हजार रुपये व काम झाल्यानंतर दहा हजार रूपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांनी सापळा रचून आरोपी अजय गायकवाड यांना तक्रारदार यांचेकडुन दहा हजारांची लाच स्वीकारताना भिवंडी येथे रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पुढील तपास संतोष अंबिके पोलीस निरीक्षक,ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0