Bhiwandi Fire News : भिवंडीतील व्ही लॉजिस्टिक गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल.
•Bhiwandi Walshind V – Logis Fire भिवंडीतील व्ही लॉजिस्टिक गोदामात हायड्रोलिक ऑईल, कापड, प्लास्टिकच्या वस्तू आणि रसायनांचा मोठा साठा ठेवण्यात आला होता. आगीच्या घटनेत सर्व सामान जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.
भिवंडी :- भिवंडी तालुक्यातील वालशिंद गावात व्ही लॉजिस्टिकच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी, कल्याण आणि ठाणे अग्निशमन केंद्रातून अग्निशमन दलाच्या सहा गाड्या रवाना करण्यात आल्या. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यात शर्तीचे प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.ही भीषण आगीची घटना मुंबई-नाशिक महामार्गाजवळ घडली. या आगीच्या घटनेत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले.
भिवंडीतील व्ही लॉजिस्टिक Bhiwandi Fire News गोदामात हायड्रोलिक ऑईल, कापड, प्लास्टिकच्या वस्तू आणि रसायनांचा मोठा साठा ठेवण्यात आला होता. आगीमुळे गोदामात ठेवलेला सर्व माल जळून खाक झाल्याची माहिती आहे. यामुळे किती प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे त्याची अद्यावत माहिती समोर आली नाही.