भिवंडीतील एका कारखान्याला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
ANI :- भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसीतील एका कारखान्याला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे वृत्त समजताच लोक जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धावू लागले. आगीच्या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
जिल्ह्यातील भिवंडी परिसरात मंगळवारी पहाटे एका सॅनिटरी नॅपकिनच्या कारखान्याला आग लागली, मात्र यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, असे महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी राजू वरळीकर यांनी सांगितले की, सरवली औद्योगिक परिसरात असलेल्या कारखान्यात पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली.
ते म्हणाले की, बीएनएमसी अग्निशमन दलासह ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून सकाळी 8.30 पर्यंत आग आटोक्यात आणली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र कारखान्यात ठेवलेला कच्चा माल जळाल्याचे त्यांनी सांगितले. कुलिंग ऑपरेशन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आगीचे कारण तपासले जात आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…